भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार?; संतोष परब हल्ला प्रकरण, विधान भवनातील म्याव म्याव अन् निलंबनाची मागणी, वाचा सविस्तर…

Shiv Sena Mla Suhas Kande Raised Demand For Suspension Of Nitesh Rane From Assembly, Also Reports On Preparation Of Arrest in Santosh Parab Attack Case

Nitesh Rane : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनुचित वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. Shiv Sena Mla Suhas Kande Raised Demand For Suspension Of Nitesh Rane From Assembly, Also Reports On Preparation Of Arrest in Santosh Parab Attack Case


प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनुचित वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

गेल्या आठवड्यात राणे विधानभवन संकुलात बसले असताना ठाकरे इमारतीच्या आत जाताना पाहताच त्यांनी ‘म्याव’ असा आवाज केला, असा आरोप त्यांनी केला. राजकारण्यांविरुद्ध असभ्य वर्तन होऊ द्यायचे नाही, यावर सर्व सदस्यांचे एकमत असल्याचे कांदे यांनी सांगितले, मात्र राणे यांनी आपल्या वागणुकीचे समर्थन करत यापुढेही असेच वागणार असल्याचे सांगितले.

नेत्याचा अपमान सहन करू शकत नाही : कांदे

कांदे म्हणाले, “आदित्य ठाकरे हे आदरणीय असून त्यांनी नितेश राणेंकडे लक्ष दिले नाही. आमच्या नेत्याचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही. राणेंनी सभागृहात माफी मागावी अन्यथा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी कांदे यांना पाठिंबा दिला. राणे यांचे विधानसभेच्या सदस्यत्वावरून कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे, अशी मागणी पक्षाचे दुसरे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केली.

शिवसेनेच्या सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजी आणि गदारोळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. विशेष म्हणजे नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश यांना त्यांच्या वागणुकीबद्दल फटकारले जाईल, असे सांगितले.

निलंबन योग्य नाही : फडणवीस

माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेसाठी सदस्याला निलंबित करणे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सभागृहात आल्यावर भास्कर जाधव आवाज उठवायचे, असे फडणवीस म्हणाले होते. सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेची विधानसभेत चर्चा का होत आहे, असा प्रश्न भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मंगळवारी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितले.

नितेश राणेंच्या अटकेची तयारी?

दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणावरूनही नितेश राणेंविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. या हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांनी नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी अटकेची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय मंत्री राणे म्हणतात, पराभवाच्या भीतीमुळे विरोधकांकडून सुडाचे राजकारण

दरम्यान याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंका व्यक्त केली असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणेंना अटक होण्याबद्दलच्या वृत्तावर भाष्य केलं. राणे म्हणाले, ‘कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? सत्तारुढ लोकांचा जिल्हा बँकेत पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हे सुरू आहे. केस दाखल केलीये की नाही, मला माहिती नाही. काल मी जिल्ह्यात होतो, पण तोपर्यंत काही झालेलं नव्हतं. हे सुडाच्या राजकारणातून चाललं आहे.

शिवाय नितेश राणे अज्ञातवासात गेल्याच्या वृत्तावर बोलताना राणे म्हणाले, ‘अज्ञातवासात नाहीये. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही. ते आमदार आहेत. त्यामुळे अज्ञातवासात वगैरे काही नाही. अटक करण्याच्या बातम्या दिल्या जात असतील, तर आम्ही न्यायालयात तर जाणारच’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतोष परब खुनी हल्ला प्रकरणात आपली चौकशी करून या प्रकरणामध्ये अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

संतोष परब हल्लाप्रकरणी सहा आरोपी ताब्यात

दरम्यान, संतोश परब हल्ल्याप्रकरणी तपास चालू असल्याबाबत माहिती पोलिसांची दिली आहे. आमदार नितेश राणे यांचा या प्रकरणातील सहभागाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. पोलीस महासंचालक सिंघल यांनी प्रसार माध्यमांसमोर येण्याचे टाळले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पत्रकाराना माहिती दिली. जिल्हा बँक निवडणुकीचे वातावरण आता जिल्ह्यात चांगलंच तापू लागले आहे. आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा, अशी मागणी करण्यात आली. तर जिल्हा बँकेचे मतदार बेपत्ता असलेल्या प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्या अशी मागणीही करण्यात आली. यावेळी तापसी अंमलदार कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन देण्यात आले.

Shiv Sena Mla Suhas Kande Raised Demand For Suspension Of Nitesh Rane From Assembly, Also Reports On Preparation Of Arrest in Santosh Parab Attack Case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात