विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : औरंगाबाद येथील दूध संघाच्या निवडणुकीवरून शिवसेनेचे दोन मंत्रीच एकमेंकांशी भिडले आहेत. दूध संघाच्या निवडणुकीत समर्थक पराभूत झालेल्या राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात थेट भूमिका घेत येत्या निवडणुकीमध्ये भुमरे यांच्या विरोधात दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.Shiv Sena ministers clash over Dudh Sangh elections, Sandipan Bhumare targets Abdul Sattar
सत्तारांच्या या वक्तव्यावर बोलताना भुमरे यांनीही टोलेबाजी केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. सत्तार यांनी शिवसेना आम्हाला सांगू नये. पक्षप्रमुखांनी सांगितले तर पैठण मतदारसंघातूनही निवडणूक लढवावी, असे म्हटले आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदी हरिभाऊ बागडेच राहतील, अशी घोषणा राज्यमंत्री सत्तार यांनी केली होती. दूध संघातील निवडणुकीनंतर अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री सत्तार यांनी गोकुळसिंग राजपूत यांना उमेदवारी देण्याचे नक्की केले. आपल्या उमेदवारास पहिले अडीच वर्षे उपाध्यक्ष हवे असा त्यांचा आग्रह होता.
संदीपान भुमरे यांनी दिलीप निरफळ यांना उमेदवारी दिली. निरफळ निवडून यावे यासाठी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी त्यांना साथ दिली. शिवसेनेचा उमेदवार म्हणून दिलीप निरफळ यांचे नाव निश्चित झाल्यानंतरही होणाºया राजकीय घडमोडींची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर कानावर टाकण्यात आली.
झालेल्या निवडणुकीत गोकुळसिंग राजपूत पराभूत झाले आणि राज्यमंत्री सत्तार यांनी मंत्री भुमरे व बागडे यांच्यावर आगपाखड केली.यानंतर सत्तार यांनी दूध संघातील भ्रष्टाचार काढू, रोजगार हमी योजनेतील रस्त्यांच्या कामातील अपहार बाहेर काढू, अशी वक्तव्ये केली. या शिवाय पैठण मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवार बदलावा, अशी मागणीही करणार असल्याचे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App