संजय राऊत यांची नाशकात पत्रकार परिषद, प्रसाद लाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, सोमय्यांनाही केले लक्ष्य


शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नाशकात पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या किरीट सोमय्यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या सोमय्यांना संजय राऊत यांनी थेट इशाराच दिला आहे. तुमची बकबक आणि पकपकच तुमच्या पक्षाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.Shiv Sena Leader Sanjay raut Criticizes BJP Leader kirit somaiya In Press Conference In Nashik


प्रतिनिधी

नाशिक : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नाशकात पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या किरीट सोमय्यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या सोमय्यांना संजय राऊत यांनी थेट इशाराच दिला आहे. तुमची बकबक आणि पकपकच तुमच्या पक्षाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत म्हणाले, तुमची ही बकबक काही काळ चालेल, राज्यातील जनता बकबकीला अजिबात उत्तर देत नाही. ही तुमची बकबक आणि पकपक हेच एकदिवस तुमच्या पक्षाच्या राजकारणाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही.



प्रसाद लाड यांच्यावर थेट आरोप

संजय राऊत पुढे म्हणाले की, मी तुम्हाला स्मार्ट सिटीचा घोटाळा दिला. भाजप नेत्याची ही कंपनी आहे. त्याचे कुटुंबीय ही या कंपनीत आहेत. प्रसाद लाड असं त्यांचं नाव आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढताय तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही 10 प्रकरणं काढताना 11 वा घोटाळा काढा. तुम्ही 24 हजार घोटाळे काढा. खोटे आहेत ते. बोगस आहात तुम्ही. काल अजितदादांनी जरंडेश्वरप्रकरणात जी कागदपत्रं त्यावर काय उत्तर आहे? अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यांनी मांडलेले मुद्दे चिंतन करण्यासारखे आहे. पुराव्यासह मुद्दे मांडले आहेत. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रं बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. त्याला अजितदादांनी पुराव्यासह चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

अमित शहांनी काश्मिरातच थांबावं

संजय राऊत पुढे म्हणाले की, बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर केल्या नाही. आम्ही पळून गेलो नाही. बांगलादेश आणि काश्मीर खोऱ्यातील हिंदुंना संरक्षण देण्यासाठी आम्ही लेख लिहिला आहे. हिंदुच्या रक्षणावर बोलणं म्हणजे दारिद्रय आहे का? स्वामींनी सांगितलं बांगलादेशात हिंदू खतरे मे आहे. त्यासाठी युद्ध करा, असं स्वामींनी म्हटलं आहे. त्यावर काय म्हणणार मिस्टर शेलार? काश्मीर खोऱ्यात 17 दिवसांत 21 शिखांच्या हत्या झाल्या आहेत. 19 जवान शहीद झाले आहेत.

हा प्रश्न विचारणं म्हणजे दारिद्र्य आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरच्या दौऱ्यावर आहे असे विचारताच राऊत म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. अमित शहा यांनी काही दिवस त्यांनी तिथेच थांबले पाहिजे. अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर गुलमर्गमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस सुरू आहे. गृहमंत्री थांबले तर अतिरेक्यांवर दबाव येईल. लोकांना सैनिकांना सुरक्षा दलाला पाठबळ मिळेल.

हा तर मोदींचाच अपमान!

दरम्यान, संजय राऊत हे शरदर पवारांचे प्रवक्ते आहेत की ठाकरेंचे या किरीट सोमय्या यांच्या टीकेवरही त्यांनी पलटवार केला. राऊत म्हणाले की, मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून सोमय्यांना स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार पाठवला. मी दोघांचाही प्रवक्ता असेल. शरद पवार हे परग्रहावरून आलेत का? ते देशाचे मोठे नेते आहेत. त्या सोमय्यांना माहिती नसेल म्हणून सांगतो,

मोदी पवारांना गुरू मानतात. मोदींनी जाहीरपणे सांगितलं आहे. मोदी म्हटले पवारांचं बोटं धरून मी राजकारणात आलो आहे. एका अर्थाने सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत. सोमय्या मोदींच्या गुरूंचा अपमान करत आहेत, असंच म्हणावे लागेल.

ते पुढे म्हणाले की, परमबीर सिंग यांना कोणी पळवलं देशातून? केंद्राच्या परवानगीशिवाय एखादा अधिकारी पळून जाऊ शकतो का? सोमय्यांना एवढं जर माहीत नसेल तर हिमालयात जाऊन बसा म्हणावं.!

Shiv Sena Leader Sanjay raut Criticizes BJP Leader kirit somaiya In Press Conference In Nashik

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात