WATCH : पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटीत घोटाळा संजय राऊत यांचा आरोप, चौकशीची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.ते म्हणाले, जे घोटाळे सुरू आहेत ते २०१८ ते २०१९ मध्ये झाले. ते बाहेर काढले जात आहेत.पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठा घोटाळा झाला आहे.In Pimpri Chinchwad Smart City scam: sanjy Raut

क्रिस्टल कंपनीने नियम धाब्यावर बसवून घोटाळा केला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जे घोटाळे उघड करत आहेत त्यांना त्याची कागदपत्रे देत आहे. त्यांनी यावर अभ्यास करावा.कोणत्याही राजकीय पक्ष असो घोटाळा हा घोटाळा असतो.



कोरोना लासीकरणावर ते म्हणाले, वेगवेगळे आकडे येत आहेत. कोणी म्हणतोय शंभर कोटी डोस झाले, कोणी म्हणते ३३ कोटी डोस झाले, तर कोणाला दुसरा डोस मिळालाच नाही. पण या देशांमध्ये आता सर्वकाही सेलिब्रेशन करण्याचा पायंडा पडला असेल, तर आपण देखील मोदींच्या या उत्सवांमध्ये सामील होऊया.

देशात मजबूत सरकार असताना बांगलादेश आणि काश्मीरमधील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. सरकारसमोर हे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

  • पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटीत घोटाळा
  • संजय राऊत यांची याबाबत चौकशीची मागणी
  • घोटाळा हा घोटाळाच, राजकीय पक्ष कोणताही असो
  • काश्मीर, बांगलादेशातील हिंदूवरील हल्ल्याचा निषेध
  • केंद्रातील सरकारने पावले उचलण्याची मागणी

In Pimpri Chinchwad Smart City scam: sanjy Raut

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात