प्रतिनिधी /वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेनेचे वरिष्ठ आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांची काल सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने सुमारे आठ तास कसून चौकशी केली. या संदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने रवींद्र वायकर यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी झाल्याचे ट्विट केले आहे. मात्र याचे तपशील दिले नाहीत. Shiv Sena leader Ravindra Waikar was questioned by ED today for around eight hours in connection
हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण नेमके काय आहे? या प्रकरणात रवींद्र वायकर यांची ईडीने चौकशी केली या बाबतचा खुलासा उलगडा भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि रवींद्र वायकर यांच्यातील कोर्टकेस मधून होतो आहे. रवींद्र वायकर यांच्या जमीन खरेदी व्यवहाराशी संबंधित ही केस आहे आणि त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचाही संबंध असल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. या बद्दल रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वाईकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.
Shiv Sena leader Ravindra Waikar was questioned by ED today for around eight hours in connection with a money laundering case, says the Enforcement Directorate — ANI (@ANI) December 21, 2021
Shiv Sena leader Ravindra Waikar was questioned by ED today for around eight hours in connection with a money laundering case, says the Enforcement Directorate
— ANI (@ANI) December 21, 2021
2021 च्या मार्चमध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी पदाचा गैरवापर करत 2014 मध्ये अलिबागमध्ये जमिनींची खरेदी केली आणि नंतर त्या आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे हस्तांतररित केल्या होत्या. रवींद्र वायकर यांनी आपल्या संपत्तीची पूर्ण माहिती दिली नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केला. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल त्यांनी 3 मार्चला रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आली. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केलेला होता. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे.
कोर्लाई येथील जमिनीवर 19 बंगले असल्याचा आणि ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचाही उल्लेख सोमय्यांनी केला होता. मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले आणि शाहीद बलवा यांच्याकडून 25 कोटींचा मोबदला मिळाल्याचा सोमय्यांचा दावा आहे.
किरीट सोमय्या यांनी एका पाठोपाठ एक आरोपांच्या फैरी लावल्यानंतर एप्रिल महिन्यात रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी किरीट सोमय्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोंटीचा मानहानीचा दावा ठोकला. किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार आरोपांनी आपल्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा वायकर दांपत्याने केला आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असताना किरीट सोमय्या यांना कोणत्याही प्रकारे प्रतिमा खराब करण्यापासून रोखावे, अशी मागणीही केली होती.
आता डिसेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांची काल 21 तारखेला सक्तवसुली संचालनालय अर्थात ईङीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुमारे आठ तास चौकशी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App