उठा उठा निवडणूक आली गिफ्ट वाटण्याची वेळ झाली; मुंबईत दिवाळी वाटपात शिवसेना नगरसेवक आघाडीवर!!


प्रतिनिधी

मुंबई : दिवाळी अगदी तोंडावर आली आहे कोरोनाचे सावट थोडे हटले आहे, पण महापालिका निवडणूक जवळ आल्यानंतर सगळे नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्ते मनातल्यामनात म्हणताना दिसत आहेत, “उठा उठा निवडणूक आली गिफ्ट वाटण्याची वेळ झाली…!!”Shiv Sena corporators lead in Diwali distribution in Mumbai

दिवाळी जवळ आली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यास राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये जाऊन दिवाळी भेट वाटप सुरु झाले असून यामध्ये शिवसेना नगरसेवक पुढे असल्याचे पहायला मिळत आहे.



दिवाळीनिमित्त आता प्रत्येक नगरसेवक दिवाळीचा फराळ, तसेच फराळ बनवण्याचे साहित्य, सुगंधित उटणे, साबण आदी वस्तूंचे किट भेट म्हणून देत असतात. यंदा मात्र, अशा प्रकारे वस्तूंचे किट देण्यामध्ये शिवसेना नगरसेवक पुढे असल्याचे दिसून येत आहे.

वडाळा येथील शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी मोफत दिवाळी फराळ साहित्य रवा, बेसन, मैदा, साखर, पोहे, उटणे व पर्यावरणपूरक बॅग यांचे ५ हजार कुटुंबांना वाटप करण्याचा संकल्प केला असून या बॅगचे वाटप सुरु आहे.

तर शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक १९२ च्या नगरसेविका प्रिती पाटणकर यांनीही दिवाळीनिमित्त फराळ साहित्यांचे वाटप केले आहे. प्रभाग क्रमांक १९४चे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी लोकांना पणती, उटण्यांचे वाटप केले आहे.

वरळीतील प्रभाग क्रमांक १९३ मधील नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनीही विभागातील दीपावलीनिमित्त स्वस्त दरात धान्य वितरण करण्यास सुरुवात केली आहे.

तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी भायखळ्यातील जनतेला सवलतीच्या दरात दिवाळी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. कोरोना काळात निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत साहित्यही देण्यात आले. मात्र, एरवी भाजपचे नगरसेवक पुढे असतात. परंतु यंदा भाजप अजून तरी दिवाळी वाटपात जास्त पुढे असल्याचे दिसून येत नाही.

Shiv Sena corporators lead in Diwali distribution in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात