शिंदे – फडणवीस सरकार : मंत्रिमंडळात विस्तारात नवे धक्कातंत्र??; भाजप गुजरात फॉर्म्युला वापरणार??


नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारच्या शक्तिपरीक्षेबरोबरच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू झाली आहे. मराठी माध्यमे आपल्या आपापल्या नावांच्या याद्या सादर करून मंत्र्यांची नावे निश्चित करत आहेत. जणू काही माध्यमांनी दाखविलेल्या याद्यांच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले मंत्रिमंडळ बनवणार आहेत असा माध्यमांचा होरा आहे!! पण यातले सत्य काही वेगळेच आहे. कदाचित अधिक मोठ्या धक्कातंत्राचे आहे!! Shinde Fadanavis government : will BJP apply gujrat formula in cabinet expansion??

उद्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत शक्तिपरीक्षेचा पहिला टप्पा पार होईल. त्यानंतर विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घ्यावा लागेल. मात्र त्यानंतरची सगळी रस्सीखेच ही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला स्थान कसे मिळेल?, कोणते मिळेल?, यावर होणार आहे.

– फडणवीस अर्थ आणि गृहमंत्री??

खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वात हेवीवेट नेते म्हणून अर्थ आणि गृह ही दोन्ही खाती सोपवली जाण्याची शक्यता आहे. फडणवीसांकडे या खात्यांमधून सरकारची सर्व महत्त्वाची सूत्रे राहण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटात अनेक नावे मंत्रिपदासाठी इच्छुक आणि उत्सुक आहेत. यात अपक्ष आमदारांचा भरणा अधिक आहे. परंतु एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्याने आमच्या गटातील 50 पैकी 50 आमदारांनी मंत्रीपदे दिली नाहीत तरी चालतील. आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास करून द्या. एवढे आम्हाला पुरेसे आहेत, असे वक्तव्य शिंदे गटाच्या 50 आमदारांतर्फे दीपक केसरकर यांनी केले आहे.

– शिंदे गटाची सेफ गेम

शिंदे गटाची ही एक सेफ गेम आहे. कोणालाही न दुखवण्याची ही राजकीय क्लुप्ती आहे. कोणतीही नावे बाहेर फुटू नयेत यासाठी शिंदे गट काळजी घेत आहे.

– जुन्यांना संधी नाही??

पण त्या पलिकडे जाऊन स्वतः भाजपट शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवे धक्कातंत्र अवलंबणार का??, याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 2014 – 19 च्या फडणवीस सरकारमधील आधीच्या कोणत्याच मंत्र्यांना संधी न देता थेट भाजप मधल्या नव्या दमाच्या तुलनेने तरुण नेत्यांना संधी दिली जाते का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

– भाजपचा गुजरात फॉर्म्युला

भाजपने असा प्रयोग गुजरात मध्ये काही महिन्यांपूर्वीच केला आहे. जे कधीच मंत्री राहिले नव्हते, त्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले आणि आधीचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात संधी न देता संपूर्ण मंत्रिमंडळच बदलून टाकले आणि एक नवीन फॉर्म्युला अस्तित्वात आणला. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारमध्ये भाजप हा “गुजरात प्रयोग” राबवणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

– पहिली झलक दाखवलीच आहे

गुजरात प्रयोगाची झलक भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून आणि त्यानंतर भाजप मधल्या आणि शिंदे गटातल्या सर्व जेष्ठ आमदारांना बाजूला सारून राहुल नार्वेकर या तुलनेने तरुण आमदाराला विधानसभेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी देऊन आधीच दाखविली आहे. आता यापुढचे धक्कातंत्र मंत्रिमंडळ विस्तारात सगळ्या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाजप वापरणार का?, याविषयी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

Shinde Fadanavis government : will BJP apply gujrat formula in cabinet expansion??

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था