उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवारांच्या शुभेच्छा

विशेष प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरवले आहे. संजय राऊत यांनी आपल्या खास अंदाजात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेला शुभेच्छा दिल्या आहेत. sharad pawar wishes good luck CM uddhav thackeray`s national leadership ambition

उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करावे. तो दिवस फार दूर नाही, अशा शुभेच्छा संजय राऊतांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना संजय राऊतांच्या या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचे समर्थन त्यांना मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे.” पवारांच्या या शुभेच्छांचे राजकीय निरीक्षक वेगवेगळे अर्थ काढत आहेत.संजय राऊतांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा देताना महाविकास आघाडीची स्थापना होत असताना उद्धव ठाकरे यांची काही वक्तव्ये तसेच त्यांच्या अन्य राजकीय हालचालींची याचा विडिओ ट्विटमध्ये शेअर केला आहे. उद्धव ठाकरे यांची वाटचाल राष्ट्रीय नेतृत्वाकडे चालल्याचे यातून संजय राऊत यांनी निदर्शनास आणले आहे. “अखंड साथ, अतूट नाते” राष्ट्राचे नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल,” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एकीकडे पश्चिम बंगालचे राज्य दोन तृतीयांश बहुमताने जिंकून ममता बॅनर्जी राष्ट्रीय नेतृत्वावर आपली मोहोर उमटवत आहेत. आज दिवसभर त्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उद्या त्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देखील भेटणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी केलेले ट्विट “राजकीय सूचक” आहे. त्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया देखील तितकीच सूचक आहे.

sharad pawar wishes good luck CM uddhav thackeray`s national leadership ambition

महत्त्वाच्या बातम्या