विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवारांच्या बातम्यांनी माध्यमांचे भरले रकाने, पण शिंदे – फडणवीस निघाले वस्ताद घट्ट खुर्चीवर बसणारे!!, अशीच आज महाराष्ट्रातली खरी राजकीय स्थिती आहे. मराठी माध्यमांनी शरद पवार – अजित पवार यांच्या बातम्या रकाने भरभरून दिल्या आहेत. पवार कोणती खेळी करणार??, त्यांनी पत्रकार परिषदेत कोणते उद्गार काढले??, कुणा – कुणाला गुगली टाकली??, वगैरे बातम्या माध्यमांनी रंगवून दिल्या. मोदी – फडणवीस यांना पवारांनी टार्गेट केल्याचे माध्यमांनी आवर्जून सांगितले, पण पवारांनी आपल्याकडच्या आमदारांची संख्या अजूनही गुलदस्त्यातच ठेवली, हे मात्र सांगायला माध्यमे विसरली. Sharad and ajit pawar have no capacity to politically harm shinde – fadnavis government by any kind of move!!
त्या पलीकडे जाऊन गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माध्यमांनी जी पवारनिष्ठागिरी दाखवली, त्यातून महाराष्ट्राचे राजकारण खऱ्या अर्थाने हलले का??, हे पाहणे महत्त्वाचे आहे आणि त्याचे उत्तर, “बिलकुल नाही” असेच द्यावे लागेल. कारण खुद्द शरद पवारच काय किंवा अजित पवार काय यांच्या कोणत्याही राजकीय हालचालीतून शिंदे – फडणवीस सरकारला कोणतीही डग लागणार नाही. ही वस्तुस्थिती माध्यमांनी सांगितली नसली, तरी ती बदलत नाही!!
अजित पवारांबरोबरचे आमदार शरद पवारांकडे जावोत किंवा शरद पवारांकडचे आमदार अजित पवारांकडे यवोत, हे ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असेच होणार आहे. पण त्या आमदारांची संख्या एवढी मर्यादित आहे, की त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारला बिलकुलच फरक पडणार नाही.
देवेंद्र फडणवीस तर आता शासकीय पाहुणे म्हणून जपान दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीस यांचे राजकीय महत्त्व त्यातून अधोरेखित होत आहे. त्यामुळे पवारांनी त्यांना चिडवले अथवा डिवचले तरी त्यातून त्यांना काही फरक पडणार नाही!!
दोन्ही पवारांच्या हालचालींनी आता जर शिंदे – फडणवीस सरकारलाच काही फरक पडत नसेल, तर केंद्रातल्या मोदी सरकारला किती फरक पडेल??, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही!!
मग पवारांनी आपला पक्ष अजितदादांकडे सरेंडर करो, आमदार सरेंडर करोत किंवा न करोत, शिंदे – फडणवीस सरकारच्या स्थैर्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत आपल्याकडे “शून्य” आमदार असल्याचे खोचकपणे पत्रकारांना सांगितले. वर चेष्टा सोडून द्या, पण 1980 मध्ये आपल्याकडे 54 आमदार होते. त्यातले 50 आमदार सोडून गेले आपण 4 – 5 आमदारांचा नेता उरलो. नंतरच्या निवडणुकीत त्यातले सगळे आमदार पडले फक्त 4 – 5 पुन्हा निवडून येऊ शकले, अशी आठवण पवारांनी सांगितली. याचा अर्थ पवारांनी सांगितलेला आकडा पुन्हा 50 – 54 चाच राहिला. त्या पलीकडे गेला नाही.
– पवारांचे उपद्रव मूल्य अजितदादांचे आमदार पाडण्यापुरतेच!!
म्हणजे पवारांनी सांगितलेल्या या कहाणीतून 2024 साठी दिलेला इशारा अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांसाठीच लागू आहे. याचा अर्थ पुढच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येवोत किंवा विभक्त राहोत, तेव्हा देखील पुन्हा ताटातले वाटीत किंवा वाटीतले ताटात, असेच होणार आहे. म्हणजे शरद पवारांचे राजकीय उपद्रव मूल्य अजित पवारांच्या आमदारांना पाडण्याइतपतच महत्त्वाचे ठरणार आहे. हे खुद्द पवारांच्याच कहाणीतून समोर येते आहे.
– ताटातले वाटीत, वाटीतले ताटात!!
कारण 1980 मध्ये देखील पवारांच्या बरोबर गेलेले पवारांना सोडून गेलेले 50 आमदार पडले. पण 288 पैकी 50 आमदार पडले. बाकीचे जे पवारांबरोबर गेलेच नव्हते, त्यापैकी सर्वाधिक आमदार पुन्हा निवडून आले. हीच वस्तुस्थिती पवारांनी अधोरेखित केली ना!! म्हणजेच पुन्हा त्यावेळी देखील ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असे झाले होते. यापेक्षा फारसे वेगळे काही घडले नव्हते. त्यावेळी आजच्या इतके कदाचित माध्यमांनी पवारांच्या बातम्यांनी रकाने भरले नसतील, पण त्याचाही परिणाम फारसा झाला नव्हता हे आकडे बोलण्यातून दिसून येते.
2023 मध्ये माध्यमांनी पवारांच्या बातम्या रकाने भरले, व्हिडिओ चालवले, पण शिंदे – फडणवीस सरकार तस्स की मस्स व्हायला तयार नाही. काँग्रेस आणि ठाकरे यांना फरक पडण्याची शक्यता नाही. जे काही शरद पवारांचे उपद्रव मूल्य असेल,त्यातून अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पडणार आहेत. या पलीकडे फारसे काही घडेल असे वाटत नाही, असे पवारांच्या बोलण्यातून उघड होत आहे. फक्त ते मराठी माध्यमे सांगत नाहीत इतकेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App