मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बाकी सगळे राजकीय पक्ष मीडिया ग्लेअर आपल्याकडे खेचून घेण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय जनता पक्षाने मात्र मीडिया पर्सेप्शन पलीकडले ग्राउंड वर्क सुरू केले आहे. 40 MLAs of Maharashtra will go to Madhya Pradesh for training

यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकांबरोबरच 2023 मध्ये होणाऱ्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधल्या जमिनी स्तरावरच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र भाजपचे 40 आमदार मध्य प्रदेशात ट्रेनिंग साठी जाणार आहेत, 4 राज्यांतील सुमारे 250 आमदार या ट्रेनिंग मध्ये सहभागी होत असून ज्या राज्यांमध्ये प्रत्यक्ष निवडणूक आहे, ती राज्य सोडून अन्य राज्यांमधील आमदारांना प्रशिक्षण, सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष जमिनीस्तरावरचे काम यामध्ये गुंतवण्यात येणार आहे. यातून राज्यातील प्रत्येक मतदारसंघांच्या समस्या, तिथली पक्षाची राजकीय अवस्था, विरोधकांची आणि भाजपची शक्ती यांचा तुलनात्मक अभ्यास करून जनतेची नाडी भाजपचे प्रदेश आणि केंद्रीय स्तरावरचे नेतृत्व समजावून घेऊन त्यानुसार निवडणुकीची उमेदवारी, प्रचाराची रणनीती आदी बाबींची आखणी करणार आहे.

महाराष्ट्र भाजपची अत्यंत महत्त्वाची संघटनात्मक बैठक पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. त्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य तसेच संघाचे काही वरिष्ठ नेते उपस्थित होते. यात जमिनी स्तरावर प्रत्यक्ष कामाचे नियोजन कसे करता येऊ शकेल?, या संदर्भात व्यापक आणि सखोल चर्चा झाली.भाजपमध्ये अशा बैठकांचा दौर सुरू झाला असताना बाकीचे राजकीय पक्ष मात्र माध्यमांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय क्लुप्त्या लढवत आहेत. “इंडिया” आघाडीचे अजूनही तळ्यात मळ्यात सुरू आहे. मुंबईत 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरच्या बैठकीला कोणते राजकीय पक्ष येणार आणि येणार नाहीत, याची चर्चा माध्यमांकरवी हे सर्व पक्ष एकमेकांशी करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे वेगवेगळ्या राज्यांमधले 250 आमदार प्रत्यक्ष जमिनी स्तरावर कोणत्या पद्धतीने काम करून निवडणुकीचे नियोजन करता येईल?, याचे ट्रेनिंग घेणार आहेत.

– बावनकुळे यांचा 27 दिवसांचा दौरा

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या 20 ऑगस्ट पासून पुढचे 27 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणारा असून सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यातील 24 लोकसभा मतदारसंघांचा आढावा तिथल्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद, आमदार – खासदारांशी समन्वय यावर भर देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या सर्व खासदारांना केंद्रातील योजनांच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष घालून निगराणी ठेवायला सांगितले आहे. किंबहुना केंद्रातील सर्व योजना या लोकसभा मतदारसंघात अंमलात आणल्या पाहिजेत, असा आग्रह धरला आहे. या योजनासंदर्भातला फीडबॅक देखील बावनकुळे घेणार आहेत. पहिल्या 27 दिवसांच्या दौऱ्यानंतर योग्य वेळी पुढच्या दौऱ्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.

40 MLAs of Maharashtra will go to Madhya Pradesh for training

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात