विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी अजित पवारांची “गुप्त” असलेली आणि नसलेली भेट शरद पवारांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्माण केलेल्या राजकीय संभ्रमाच्या वातावरणात आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून एक बाब अधोरेखित झाली ती म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी पवारांना वगळून स्वतंत्रपणे महाराष्ट्रात लढाईची तयारी चालवतात पवारांनी पुन्हा इंडिया आघाडीत गोडी घेतली आणि काँग्रेस ठाकरेंच्या “स्वतंत्र तयारीला” टाचणी लावली. Sharad pawar back in I.N.D.I.A but punctured independent efforts of Congress and thackeray
बाकी पवार स्टाईलने पत्रकार परिषदेत फटकेबाजी करूनही राष्ट्रवादीतल्या आमदारांची संख्या तुमच्या बाजूने नेमकी किती??, या प्रश्नाचे उत्तर देताना ती आमदार संख्या गुलदस्त्यातच ठेवली. पत्रकाराच्या त्यासंबंधीच्या प्रश्नाला त्यांनी शून्य असे खोचक उत्तर दिले आणि वरती ते नेहमी जी 1980 च्या निवडणुकीची आणि सांगतात तीच रिपीट केली 1980 मध्ये आपल्याबरोबर 54 आमदार निवडून आले होते त्यापैकी सगळे आमदार बाजूला गेले पण त्याच्या पुढच्या निवडणुकीत म्हणजे 1985 मध्ये त्यापैकी फक्त 3 – 4 आमदार निवडून आले आणि बाकीचे पडले, अशी आठवण त्यांनी सांगितले पण आज 16 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रवादीचे नेमके किती आमदार आपल्या बाजूने आहेत हा आकडा मात्र शरद पवारांनी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवला तो पत्रकारांना सांगितलाच नाही.
त्याउलट राष्ट्रवादीच्या चिन्हाची आणि पक्षाची आपण चिंता करत नाही आपण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या बळावर भाजप विरोधात लढा उभारू, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातले सध्याचे आमदार अजित पवारांकडे सरेंडर करून टाकल्याचे शरद पवारांनी सूचित केले.
अतुल चोरडिया यांच्या घरातल्या गुप्त असलेल्या आणि गुप्त नसलेल्या भेटीनंतर आपण गाडीची काच खाली करून बाहेर पडलो त्यावेळी मला काही लोकांनी फुले दिली मी उघडपणे तिथून गेलो असे सांगून अजित पवार गाडीतून झोपून गेले किंवा कसे यावर मी भाष्य करणार नाही कारण लहान लोकांवर मी काही बोलत नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना आणि पत्रकारांना हाणला.
राजकारणात कौटुंबिक नातेसंबंध आणत नाही. अजित पवारांच्या दोन मुलांच्या लग्नाबाबत वडीलधारी व्यक्ती म्हणून मला विचारल्यावर मी त्यावर कुटुंबात बोलेन, असे सांगताना त्यांनी एन. डी. पाटलांचे उदाहरण दिले. एन. डी. पाटील यांची पत्नी म्हणजे शरद पवारांची सख्खी बहिण. या दोन्ही नेत्यांची भूमिका परस्पर विरोधी होती, पण कौटुंबिक नातेसंबंध टिकून होते, याचा हवाला पवारांनी दिला.
पण यातूनच पवारांनी राष्ट्रवादीतले शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ हे दोन्ही गट एकमेकांशी लढणार नाहीत तर आपण मात्र भाजप प्रणित एनडीए आघाडीशी लढू, असेच त्यांनी जाहीरपणे सांगितले. याचा अर्थच अजित पवार आणि त्यांच्या गटाला भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून आपण “इंडिया” आघाडीत कायम राहणार असल्याचे त्यांनी सूचित केले. आपल्याला वगळून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे लढणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा त्यांनी केला.
पण त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या संभ्रमित राजकीय वातावरणात ज्यावेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पवारांच्या राष्ट्रवादीला बघून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली या तयारीलाच पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेतून खऱ्या अर्थाने टाचणी लावली!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more