तेलाच्या पिंपात लपवून आणलेले 25 किलो हेरॉईन न्हावा शेवा बंदरात जप्त!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तिळाच्या तेलाच्या कंटेनरमध्ये लपवून आणलेले तब्बल 25 किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या मुंबई विभागीय युनिटने पकडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत शेकडो कोटी रुपये आहे. न्हावा शेवा बंदरावर तेलाच्या पिंपात लपवलेले 25 किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले. इराणच्या चाबहार बंदरातून हा कंटेनर अफगाणिस्तानातून आयात करण्यात आला होता.Seized 25 kg of heroin hidden in an oil barell at Nahvashevha

आयात केलेल्या मालामध्ये एनडीपीएस अधिनियम, 1985 अंतर्गत प्रतिबंधीत असणाऱ्या वस्तू समाविष्ट असल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)च्या मुंबई विभागीय युनिटला प्राप्त झाली होती. मुंबईच्या मस्जिद बंदरचा पत्ता असलेल्या आयातदाराच्या नावाने कंधारमधून कंटेनर आयात करण्यात आला होता. हा कंटेनर इराणमधील चाबहार बंदरातून आला होता. न्हावा शेवा बंदरातील ईएफसी लॉजिस्टिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा कंटेनर मालवाहतूक स्थानक येथे होता.महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या कंटेनरची तपासणी केली. सीमाशुल्क संबंधित कागदपत्रात कंटेनरमध्ये तीळ तेल आणि मोहरीचे तेल म्हणून माल असल्याचे सांगण्यात आले होते,मात्र सखोल तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, मोहरीच्या तेलाच्या 5 कॅनमधील सामग्री वेगळी आहे.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या 5 संशयास्पद पिंपांची कसून तपासणी केली आणि त्या तेलाच्या पाच पिम्पांच्या तळाशी लपवण्यात आलेले पांढऱ्या रंगाचे साहित्य सापडले.

एनडीपीएस फील्ड किटने त्या पदार्थांची चाचणी केल्यावर, या सामग्रीमध्ये हेरोइनच्या असल्याचे आढळले. या तपासणीनंतर , या 5 डब्यांमधून आणलेले, 25.45 किलो हेरोइन एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले.अशाप्रकारे या प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीची नवीन कार्यपद्धती समोर आली आहे. तेलाच्या पिंपात लपवलेले हेरॉईन जप्त करण्याची ,कोणत्याही भारतीय तपास संस्थेची ही पहिलीच वेळ आहे, आयात कंटेनरच्या नेहमीच्या तपासणीदरम्यान ते शोधणे जवळजवळ अशक्य होते.

तपासात असेही निष्पन्न झाले की, इराणमध्ये बऱ्याच काळापासून वास्तव्याला असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीकडून आयात करणाऱ्या कंपनीचे नाव वापरले जात होते. इराणमधील त्याच्या जुन्या संबंधांचा वापर करून अफगाणिस्तानातून त्याने हा माल पाठवला होता.एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 67 च्या तरतुदींखाली नोंदवलेल्या त्याच्या जबानीत, अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेल्या आयात मालाची खेप त्याच्याच मालकीची होती हे या व्यक्तीने कबूल केले असून त्याने त्याच्या अफगाण संबंधांविषयीचे तपशीलही दिले आहेत.

या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असताना दिल्लीहून आणखी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यांना मुंबईत ट्रान्झिट रिमांड अंतर्गत आणण्यात आले आहे. या मालाची आयात सुरळीत होण्याच्या दृष्टीने,हे दोघे हवालासह आर्थिक व्यवहारात सहभागी होते. पनवेल सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले, या न्यायालयाने त्यांची रवानगी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

याआधी जुलै महिन्यात महसूल गुप्तचर विभाग मुंबईने न्हावा शेवा बंदरावर मूळ अफगाणिस्तानातून आलेले 294 किलो हेरॉईन जप्त केले होते. त्यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये डीआरआय मुंबईने अफगाणिस्तानमधून आलेल्या मालाच्या आणखी एका खेपेमधून न्हावा शेवा बंदरावर 191.6 किलो हेरोइन जप्त केले होते. अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांचा माल इराणच्या चाबहार / बंदर अब्बास या बंदरांमधून पाठवला जातो.

या मोठ्या जप्तींव्यतिरिक्त, डीआरआय मुंबईने गेल्या एका वर्षात कुरियर पार्सल तसेच आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतून येणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे डझनभर प्रकरणात हेरॉईन आणि कोकेन काही किलोच्या प्रमाणात जप्त केले आहे. देशाची सर्वोच्च तस्करी विरोधी संस्था असल्याने, महसूल गुप्तचर संचालनालय आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ वर्तुळाविरुद्ध प्रभावी अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे अंमली पदार्थांच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी काम करते.

Seized 25 kg of heroin hidden in an oil barell at Nahvashevha

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय