विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत मोकळे झाले आहेत, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.पूरपरिस्थिती, मदत कार्य आणि दौरे या मुद्यावर संजय राऊत यांनी मत व्यक्त केले होते. त्यावर त्या बोलत होत्या.Sanjy raaut is Covering up Thackeray Governments Failure during flood disaster; Chtra wagh said
त्या म्हणाल्या, प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खूप जणांचे प्राण वाचू शकले असते. प्रवीण दरेकर व वृत्तवाहिन्या आधी त्या ठिकाणी पोचल्या. तेथील नागरिकांनीच ३९ मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर १६ तासाने प्रशासन अवतरले.
ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेंव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात व सरकार पंगू होते.ठाकरे सरकारच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात अशा दुर्घटनांमध्ये सरकारच्या निष्क्रीयेतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. संजय राऊत यानंतरसुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ होय.
नारायण राणे हे केंद्रातर्फे नुकसानीचा आढावा व मदतकार्यासाठी दौरा करत असताना अशा संकटात सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून अधिकारी गैरहजर होते?अशा कठीण प्रसंगी आपली राणे साहेबांविषयीची पोटदुखी बाजूला सारून त्यांच्या हेतुला आपण साथ द्याल, अशी अपेक्षा पुरग्रस्त कोकणच्या जनतेला होती.
परंतु, आपण हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले, असा आरोप त्यांनी केला.बाकी फौजफाटा व दर्शनसोहळा कुणी केला? याचे उत्तर येणाऱ्या दिवसात आपल्या कर्तुत्वामुळे कोकणच्या जनतेला मिळणारच आहे, असे त्या म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App