प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांचा “एकांत” ते तुरूंगातली पत्रकार परिषद… मनसेचे एकापाठोपाठ एक तिखट वार आजही सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मिमिक्री वॉर रंगल्यानंतर त्याचा पुढचा अंक आजही सुरु राहिला आहे. sanjay Raut – Raj thackeray mns
शिवसेना खासदार संजय राऊत हे रोज सकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार आगपखड करतात. पण राज ठाकरे यांच्यावर त्यांनी केलेल्या एका वक्तव्याला राज ठाकरेंनी दिलेल्या प्रत्युत्तरावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांना लवकरच तुरुंगात जावे लागणार अशी हिंट राज ठाकरे यांनी दिली आहे, अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
– एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस
मनसेच्या वर्धापन दिनी पुणे येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल केली. त्यावर आमचे राज्य हे मिमिक्रीवर चालत नाही, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. राज ठाकरेंच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता राऊतांना तुरुंगात जावे लागणार का?, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
– संदीप देशपांडे यांचे सूचक ट्विट
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्विटवरुन सुद्धा चर्चा रंगली आहे. जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरचं जेवण मागतात, काहींना पुस्तकं लागतात, काहींना औषध लागतात, यापुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असे सूचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. यामुळे आता या सगळ्याचा नेमका अर्थ शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App