वृत्तसंस्था
बिजींग : रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर चीनमधील शांघाय शहरातील शाळा बंद करण्यात आल्या असून अनेक शहरेही बंद करण्यात येत आहेत. यापूर्वी काही शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक शहरांमध्ये संसर्ग पसरत आहे
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, रविवारी येथे सुमारे ३४०० नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शनिवारच्या तुलनेत ही प्रकरणे दुप्पट आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढवली आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनमधील काही शहरांचे अनेक भाग हळूहळू बंद केले जात आहेत.
चीनमधील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. जवळपास अर्धा डझन शहरांमध्ये बाधित नोंद झाले आहेत. जिलिन शहरात सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी येथे १४१२ रुग्ण दाखल झाले आहेत. त्याच वेळी, वेगवेगळ्या शहरांमध्येही संसर्ग वाढत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more