Sanjay Raut Press : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही आरोप केले. पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा भागीदार असून त्या राकेश वाधवानने भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut Press Raut demands arrest of Kirit Somaiya and Neel Somaiya, Rakesh Wadhwans involvement in PMC scam
वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही आरोप केले. पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा भागीदार असून त्या राकेश वाधवानने भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा नील सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवानला ब्लॅकमेल करण्यात आलं आणि त्याच्याकडून कोट्यवधीची जमीन घेतली. त्यांनी एक जमीन सात कोटी रुपयांना आणि वसई येथील 400 कोटी रुपयांची जमीन चार कोटी रुपयांना घेतली आहे आणि त्या जमिनीवर जी कंपनी आहे त्या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज दोन हा हजारो कोटींची प्रकल्प उभारला आहे. त्याला पर्यावरण मंजुरी नाही. याप्रकरणी कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करा.
पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत. या बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या प्रकल्पाचे सर्व व्यवहार पीएमसी बँकेत झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कुटुंबाचा याशी थेट संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्याची ईडी चौकशी करत आहे. गेल्या तीन महिन्यांत हे सर्व पुरावे मी तीन वेळा ईडीकडे पाठवले आहेत. तुम्ही आमच्या एक गुंठे आणि दोन गुंठे जमिनीचा हिशेब मागता.
संजय राऊत म्हणाले, “कोण आहेत जितेंद्र चंद्रलाल नलवानी? मुंबईतील ७० बांधकाम व्यावसायिकांकडून ईडीच्या नावावर वसुली सुरू आहे. हे कोण आहे? ते कोणाचे लोक आहेत? ही सर्व माहिती मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देईन. मुंबईतील 60 बांधकाम व्यावसायिकांकडून 300 कोटी वसूल करण्यात आले आहेत. ईडीच्या या मंडळींनी ऐंशी वर्षाच्या वृद्धाला इथेच मरणार, तू घरी जाणार नाही, अशी धमकी दिली.
Sanjay Raut Press Raut demands arrest of Kirit Somaiya and Neel Somaiya, Rakesh Wadhwans involvement in PMC scam
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App