विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. प्रत्यक्षात त्यामध्ये त्यांनी शिवसेना स्टाईल “बाप”, “गांडू”, “दलाल”, “भडवा” या शब्दांचा मुक्त वापर करत भाजप नेत्यांना ठोकून काढले.Press conference of Sanjay Raut at Shiv Sena Bhavan : Sanjay raut targets kirit somaya in abusive language
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचा हवाला देत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर तोफा डागताना “दलाल” आणि “भडवा” हे शब्द वापरले. जर तुम्ही पाप केले नसेल तर कोणाच्या बापाला घाबरू नका, ही बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे. हा महाराष्ट्र आहे. गांडूंचे राज्य नाही, अशा शेलक्या शब्दांत मध्ये त्यांनी केंद्रीय तपास संस्थांना आव्हान दिले.
तुम्हाला काय करायचे ते करा. मला गोळ्या घाला. तुरुंगात डांबले आम्ही झुकणार नाही. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची ती शिकवण नाही, असे संजय राऊत म्हणाले. तुमचे वैर माझ्याशी असेल तर माझ्यावर कारवाई करा, आमच्या मुलीबाळींना का त्रास देता? असा सवाल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
परंतु संपूर्ण पत्रकार परिषदेत एखाद्या जाहीर सभेत शिवसेनेचा नेता बोलावा अशा भाषेत संजय राऊत आज बोलत होते. या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी प्रश्न उत्तरे घेणे टाळले. उलट या भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घालण्याची भाषा करून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, ते साडेतीन नेते म्हणजे नेमके कोण हे नंतर टप्प्याटप्प्याने सांगू, असे म्हणत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद सोडली.
या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेनेने मुंबईत महापालिका निवडणुकांच्या आधी जोरदार शक्तिप्रदर्शन करून घेतले. नाशिक, ठाणे आणि मुंबई इथल्या आमदार-खासदार यांना पत्रकार परिषदेत आवर्जून निमंत्रण होते. संजय राऊत यांनी आपल्या शेजारी माजी मंत्री दिवाकर रावते यांना आवर्जुन बसवून घेतले होते. त्याच बरोबर 900 कोटींच्या बँक घोटाळ्यात आरोप असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार अरविंद सावंत हेही त्यांच्या समवेत पहिल्या रांगेत बसले होते. मागच्या रांगेत खासदार श्रीरंग बारणे, खासदार ओमराजे निंबाळकर बसले होते. पत्रकार परिषदेला आदेश बांदेकर, सचिन आहिर देखील उपस्थित होते. शिवसेना भवनाभोवती शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहण्यासाठी तेथे अनेक ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेपेक्षा आजच्या सर्व इव्हेंटचे शिवसेनेचा मेळावा आणि शक्तिप्रदर्शन हेच त्याचे स्वरूप दिसले आणि शिवसैनिकांना ज्या भाषेने चेव येतो तीच भाषा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वापरली. त्यांनी “बाप”, “गांडू”, “दलाल”, “भडवा” या शब्दांचा मुक्तपणे वापर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचंड जाहीर सभांमध्ये बिनधास्तपणे या शब्दांचा वापर करत असत. त्या शब्दांना त्यांच्यामुळे एक विशिष्ट “राजकीय वजन” येत होते. परंतु संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्या प्रकारचे शब्द वापरून पत्रकार परिषदेचा औचित्यभंग केल्याचे दिसून आले.+
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App