विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार यांच्यात बैठक होत आहे. संजय राऊत अचानक पवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. sanjay raut meets sharad pawar
सोमवारी मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एसटी संपाच्या मुद्द्यावरुन बैठक झाली.
एसटी संपाबाबत शरद पवारांनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. आज संजय राऊतही शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत.
त्यामुळं शरद पवार आज पुन्हा एकदा पवार एसटी संपाबाबत चर्चा करणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. तसंच, एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मुद्द्यांवरही दोघा नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App