वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईचे नवे पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून हेमंत नगराळे यांची करण्यात आली आहे. संजय पांडे यापूर्वी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. सोमवारी राज्य सरकारने आदेश काढून ही नियुक्ती जाहीर केली आहे. यापूर्वी आयुक्त असलेल्या हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे.नगराळे यांची बदली पांडे याच्या जागी म्हणजेच सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली आहे. Sanjay Pandey appointed as new Mumbai police commissioner replacing Hemant Nagrale
गेल्या एक वर्षात तीन वेळा मुंबई पोलीस आयुक्त बदलण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. तेव्हा या प्रकरणी सचिन वाझे याला अटक केली होती. राज्य सरकारने तेव्हा तत्काली पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आणि त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली होती. आता राज्य सरकारने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. पांडे यांना दिलेली ही जबाबदारी म्हणजे त्यांचे डिमोशन झाल्याचे बोलण्यात येत आहे, कारण आधी त्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी होती. संजय पांडे हे १९८६ च्या आयपीएस बॅचचे असून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App