वानखेडे कुटुंबियांची बदनामी; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना रोखा; समीर आणि क्रांती वानखेडे यांची मुंबई सिव्हिल कोर्टात धाव


वृत्तसंस्था

मुंबई : वानखेडे कुटुंबियांची बदनामी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप चालू आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना रोखा, अशी मागणी करणारा अर्ज समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर वानखेडे यांनी मुंबई सिव्हिल कोर्टात केला आहे. दिंडोशीच्या सिव्हिल कोर्टात हा अर्ज करण्यात आला आहे. Sameer and kranti wankhede reached Mumbai civil court to prevent social media platforms from publication of defamatory content



गेल्या काही दिवसांपासून फेसबुक/ मेटा, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वानखेडे कुटुंबियांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध करण्यात येतो आहे. आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कोर्टाने आदेश देऊन हा मजकूर प्रसिद्ध करणे थांबवावे, अशा आशयाचा अर्ज समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर वानखेडे यांनी केला आहे.

या आधी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टाकडून अशाच स्वरूपाचा आदेश मिळवला आहेच. कोर्टाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांनी विरोधात कोणताही मजकूर सोशल मीडियावर टाकल्यावर प्रतिबंध घातला आहे. तसेच कोर्टाचा आदेश भंग केल्याबद्दल देखील त्यांच्यावर ठपका ठेवला होता. आता समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर वानखेडे यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना वानखेडे कुटुंबीयांची बदनामी करणारा मजकूर प्रकाशित करण्यावर बंधने घालावीत, अशा आशयाचा अर्ज केला आहे.

Sameer and kranti wankhede reached Mumbai civil court to prevent social media platforms from publication of defamatory content

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!