ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उद्या उघड करणार – सोमय्या


विशेष प्रतिनिधी

अलिबाग – महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याची जबाबदारी भाजपने माझ्यावर सोपवली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा हा एकमेव उद्देश असून मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मी मंगळवारी कोल्हापूर यात्रेला प्रारंभ करणार आहे. तेथे हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. Rural Development Minister Hasan Mushrif’s third scam

ते म्हणाले, पक्षातील कार्यकर्त्यांनी धाडस दाखवून स्वतःचा तालुका भ्रष्टाचारमुक्त करण्याचा प्रयत्न करावा. कर्नाळा बँक भ्रष्टाचार प्रकरणात माजी आमदार विवेक पाटील यांना अटक होऊन तीन महिने झाले; परंतु महाविकास आघाडी सरकारने त्यांची मालमत्ता जप्त केलेली नाही. आम्ही पाटील यांची ७०० कोटींची मालमत्ता विकायला लावून त्यातून ५२ हजार ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देणार आहे.

महाराष्ट्राचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफांविरोधात मी २८ सप्टेंबरला पोलिसांकडे तक्रार नोंदवणार असल्याचे ते म्हणाले. ठाकरे व वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील जमीन खरेदी केली. या जमीन खरेदी व्यवहारात १९ बंगले दाखविण्यात आले होते. ते गायब झालेले आहेत. ज्यांचे हरवलेले बंगले शोधून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तेच आमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत आहेत.

Rural Development Minister Hasan Mushrif’s third scam

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”