वृत्तसंस्था
पुणे : ,अलिकडेच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर पुण्यातील निगडीत प्राणघातक हल्ला झाला आहे. Robber Attack On Actress Sonalee Kulkarni Father
हल्लेखोर सोनालीचा चाहता असून त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. निगडी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते.
वडिल मनोहर कुलकर्णी ( वय 63) यांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजयने त्यांच्यावरच चाकूने हल्ला केला. झटापटीत ते किरकोळ जखमी झाले आहेत.
चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे. आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळला आहे. रहिवाशांनी अजयला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगितले. निगडी पोलिस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App