धर्मांतराचे बीड कनेक्शन : अटकेतील इरफान दोन वेळा मोदींसोबत व्यासपीठावर, पंतप्रधानांनीही दिली होती शाबासकी

religion conversion Beed connection Arrested Irfan twice on stage with Modi, Know His role in Conversion

religion conversion : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी धर्मांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील एटीएस सातत्याने आरोपींना अटक करत आहे. इरफान ख्वाजा खान याला मंगळवारी महाराष्ट्रातील बीड येथून अटक करण्यात आली. तो बाल कल्याण मंत्रालयात दुभाषी म्हणून काम करतो. याप्रकरणी ‘दैनिक भास्कर’ सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार इरफानने 2017 आणि 2020 मध्ये दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्यासपीठ शेअर केले होते. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये इरफानने पंतप्रधान मोदींचे भाषण कर्णबधिरांसाठी हावभावाच्या रूपात अनुवादित केले होते. religion conversion Beed connection Arrested Irfan twice on stage with Modi, Know His role in Conversion


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी धर्मांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील एटीएस सातत्याने आरोपींना अटक करत आहे. इरफान ख्वाजा खान याला मंगळवारी महाराष्ट्रातील बीड येथून अटक करण्यात आली. तो बाल कल्याण मंत्रालयात दुभाषी म्हणून काम करतो. याप्रकरणी ‘दैनिक भास्कर’ सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार इरफानने 2017 आणि 2020 मध्ये दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्यासपीठ शेअर केले होते. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये इरफानने पंतप्रधान मोदींचे भाषण कर्णबधिरांसाठी हावभावाच्या रूपात अनुवादित केले होते.

आता प्रश्न असा आहे की, जर इरफान अशा बाबींमध्ये सहभागी असेल, तर तो पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठापर्यंत कसा पोहोचला? एसपीजी आणि पीएम मोदी यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या एजन्सींना याबद्दल माहिती होऊ शकली नाही?

एक कार्यक्रम प्रयागराज, तर दुसरा कार्यक्रम राजकोटमध्ये

इरफानने पंतप्रधानांसमवेत ज्या दोन कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर शेअर केला होता. ते एक उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि दुसरे गुजरातमधील राजकोट येथे. राजकोटमध्ये हा कार्यक्रम 29 जून 2017 रोजी झाला. अपंगांसाठीच्या या कार्यक्रमात इरफानने पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे भाषांतर सांकेतिक भाषेत केले. म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी पीएम मोदींचे भाषण हावभावांमधून स्पष्ट केले होते.

दुसरा कार्यक्रम 29 फेब्रुवारी 2020 रोजी प्रयागराजमध्ये झाला. इथेही इरफान पंतप्रधान मोदींचे दुभाषा म्हणून गेला. कार्यक्रमानंतर पीएम मोदींनी इरफानच्या पाठीवर थाप दिली. त्यानंतर इरफानने माध्यमांना सांगितले की, पंतप्रधानांकडून कौतुकाचे दोन शब्द मिळणे माझ्यासाठी विशेष आहे. मला हा क्षण कायम स्मरणात राहील.

काय म्हणतात जबाबदार?

या प्रकरणात, यूपी एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांचे म्हणणे आहे की, इरफान बाल कल्याण मंत्रालयात जबाबदार पदावर तैनात होता. तो कदाचित एखाद्या कार्यक्रमात पंतप्रधानांजवळ गेला असेल. धर्मांतराच्या प्रकारात तो सामील होता हे आमच्या तपासात उघड झाले आहे. त्याची भूमिका महत्त्वाची आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

एटीएसचा दावा – तो कर्णबधिर मुलांचे धर्मांतर घडवायचा

एटीएसने मंगळवारी प्रेस नोट जारी केली. त्यात म्हटले की, इरफान हिंदू आणि इतर धर्मांतील कर्णबधिरांना इस्लामचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करत असे. तो मुलांवर इतर धर्माबद्दल द्वेष उत्पन्न करायचा आणि त्यांना उत्तेजन द्यायचा. इतकेच नव्हे, तर मूक आणि बधिर मुलांची यादीही धर्मांतरित मौलाना उमर गौतम आणि जहांगीर आलम यांना दिली होती.

अशी आहे इरफानच्या घरची परिस्थिती

इरफान तीन भावांमध्ये धाकटा आहे. इरफानचे टिनशेड घर बीड जिल्ह्यातील सिरसाळा गावच्या जायकवाडी परिसरात आहे. इरफानचे वडील ख्वाजा खान एसटी महामंडळात मेकॅनिक म्हणून काम करायचे. सात वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. काम करत असताना ख्वाजा खान यांनी परळी वैजनाथ शहरातील आझादनगर भागात घर घेतले होते. याच ठिकाणी इरफानचा जन्म 1986 मध्ये झाला होता.

इरफानचा भाऊ फरखान यांनी सांगितले की, त्याने प्राथमिक शिक्षण परळीतील बिलाल उर्दू शाळेतून केले. यानंतर परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 2013 मध्ये त्याला बाल कल्याण मंत्रालयात नोकरी मिळाली. 2015 मध्ये त्याचे लग्न झाले. फरखानच्या म्हणण्यानुसार, इरफानने अपंग मुलांसाठी बरेच काम केले आहे. ग्रामस्थांनीही इरफानचे कौतुक केले. तो असे करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

इरफानच्या अटकेची बातमी आजारी आईपासून लपवली

फरखानच्या म्हणण्यानुसार त्याने अद्याप इरफानच्या अटकेविषयी आईला सांगितले नाही. आई आजारी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही माहिती आईकडे आली तर तिचा त्रास वाढेल. इरफान नुकताच फेब्रुवारीमध्ये आई आणि भावांना भेटायला आला होता.

religion conversion Beed connection Arrested Irfan twice on stage with Modi, Know His role in Conversion

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात