शिवसेनेत झालेली फूट आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट; गुणात्मक राजकीय फरक काय??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रातील सत्ताधारी भाजपने ईडी, सीबीआय यांच्यासारख्या तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेनेत फूट पाडली तशीच फूट राष्ट्रवादीत पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्या सिल्वर ओक मधील भेटीचा हवाला देऊन शरद पवार यांचे एक वक्तव्य सांगितले आहे ते म्हणजे, शिवसेनेत फूट पाडल्याप्रमाणेच राष्ट्रवादीतही फूट पाडण्याचा भाजप प्रयत्न करतो आहे. पण राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही. जर कोणी गेले तर तो त्यांचा “वैयक्तिक निर्णय” असेल. त्यांचा पक्षाशी संबंध असणार नाही, असे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी रविवारच्या सामनातील रोखठोक मध्ये हे लिहिले होते आणि आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याच वक्तव्याचा पुनरुचारही केला आहे.Real political difference between Shivsena split and NCP’s future split

या दोन्हीही गोष्टींचा बारकाईने विचार केला, तर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे स्वतः संजय राऊत यांनी आणि त्यांनी म्हटल्यानुसार शरद पवारांनी शिवसेनेत झालेली फूट आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट यांची तुलना करून तो विषय पब्लिक डोमेनमध्ये आणला आहे. मग या पद्धतीनेच जर शिवसेनेत झालेली फूट आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट यांचा विचार करायचा असेल तर त्यामध्ये गुणात्मक राजकीय अथवा राजकीय गुणात्मक फरक काय असेल??, याचाही विचार करावा लागेल आणि तो विचार करतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राजकीय घडणीतील महत्त्वाचा भेद स्पष्ट होतो.



शिवसेनेचे स्वरूप आणि भाजपशी संघर्ष

शिवसेना हा संघर्ष संघर्षशील आणि संतप्त तरुणांचा पक्ष आहे. तो जातीपातीच्या पलिकडे जाऊन किंबहुना प्रस्थापित राजकारणाच्या पलिकडे जाऊन नव्यांना संधी देणारा पक्ष राहिला आहे. त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच काँग्रेस स्वरूपाचे राजकारण करणारा आणि सत्तेच्या वळचणीला कायम राहणारा पक्ष आहे. किंबहुना “जबाबदारी कमी आणि सत्तेचा वाटा अधिक” अशा नेत्यांचे संघटन म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस, हे या पक्षाचे मूलभूत “नेचर” आहे.

या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमधल्या फुटीची तुलना केली पाहिजे.

शिवसेनेत झालेली फूट ही उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्या राजकीय संघर्षाचा परिणाम आहे. त्यातही तो उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या टोकदार संघर्षाचा परिणाम आहे. त्या पलिकडे जाऊन काही निरीक्षकांचे मत मिसेस ठाकरे आणि मिसेस फडणवीस यांच्यातल्या संघर्षाचा तो परिणाम आहे. पण जो परिणाम आहे, तो उघड संघर्षाचा आहे एवढे मात्र निश्चित!!

राष्ट्रवादीचे स्वरूप आणि जुगाडू राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कधीच कुणाशी थेट पंगा घेत नाही. तेवढी त्यांची क्षमताही नाही. त्यामुळेच शरद पवारांच्या राजकारणाची ती शैली देखील नाही. शरद पवार हे वैयक्तिक पातळीवर कोणत्याही बड्या नेत्याला एखाद दुसऱ्या निवडणुकीपुरता धडा शिकवतात. याचे उदाहरण अनंतराव थोपटे आणि विलासराव देशमुख यांच्या बाबतीत महाराष्ट्रात घडले आहे. या दोन्ही नेत्यांना पवारांनी राजकीय खेळी करून ऐन मोक्याच्या वेळेस निवडणुकीत पाडले होते. त्यामुळे अनंतराव थोपटे यांनी मुख्यमंत्रीपद देखील कायमचे गमावले आणि पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या खरा स्पर्धक या निमित्ताने संपविला, असे राजकीय अभ्यासकांचे निरीक्षण आहे. पण विलासराव देशमुख यांच्या बाबतीत त्यांना ते साध्य करता आले नाही. विलासराव एका निवडणुकीत पराभूत झाले पण नंतर राजकारणात बाउन्स बॅक करून ते पवारांच्या इच्छेविरुद्ध महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देखील झाले. त्यावेळी पवारांना ती तडजोड मान्य करावी लागली होती.

पण पवारांच्या राजकारणाची ही झाली वैयक्तिक शैली.

राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर संघर्ष रस्त्यावर उघडपणे संघर्ष करून जनतेचा पूर्ण कौल मिळवून सत्तेवर येणारा पक्ष नाही, तर कायम सत्तेच्या वळचळणीला राहण्यासाठी आणि सत्तेचा पूर्ण सत्ता नव्हे तर सत्तेचा मोठा वाटा मिळवण्यासाठी “तत्पर” राहिलेला पक्ष आहे. त्यासाठी राजकारणाच्या सर्व शक्यता ओपन ठेवणे हा पवारांच्या राजकारणाचा एक भाग आहे. त्यामुळेच ते एकाच वेळी विरोधी ऐक्याचाही प्रयत्न करतात आणि त्याच वेळी मोदी – शाहांशी “वैयक्तिक” संबंध ठेवून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना “वैयक्तिक निर्णय” घ्यायला लावून भाजपकडे पाठवू शकतात!!

पवार राजकीय शैलीचा नमुना

यातून राष्ट्रवादीत फूट पडल्याचे “उघड” तर दिसेल, पण प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत राजकीय ऑक्सिजनची जी गरज आहे, ती म्हणजे “सत्ता”, त्या सत्तेतला विशिष्ट वाटा राष्ट्रवादीतल्या किंवा राष्ट्रवादीची मानसिकता असणाऱ्या नेत्यांना मिळेल, हा पवार शैलीचा राजकारणाचा उत्तम नमुना आहे!!

पवार शैलीच्या राजकारणामध्ये पक्ष, पक्षाचे नाव, पक्ष चिन्ह हे गाजराच्या पुंगी सारखे असते. गरज असेल असेल तोपर्यंत ती वाजवायची अन्यथा ती मोडून खाऊन नवे रूप धारण करायचे की पवार राजकारणाची शैली आहे. राष्ट्रवादी शिवसेनेत झालेली फूट आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फूट यातला हा गुणात्मक राजकीय फरक असेल. तो सध्यातरी पवारांच्या पथ्यावर पडणारा असेल, पण नेहमीसारखाच अंतिमतः त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला तडा देणारा असेल!!

Real political difference between Shivsena split and NCP’s future split

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात