सावरकरांचा अपमान : मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना दम, पण नागपूरच्या सभेत वडेट्टीवार कन्येपुढे नांगी!!


विशेष प्रतिनिधी

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना दम जरूर भरला, पण त्यानंतर देखील काँग्रेस नेत्यांनी सावरकरांचा अपमान करणे सोडले नाही. काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्येने सावरकरांच्या पुस्तकाचा कथित हवाला देऊन त्यांचा अपमान केला. त्या शिवानी वडेट्टीवार यांच्यापुढे मात्र उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या वज्रमुठ सभेत नांगी टाकलेली दिसली. Mahavikas aghadi vajra muth sabha in nagpur

कारण या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील भाजप सरकारवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोरदार शरसंधान साधले, पण त्यांनी सावरकरांचे नाव अजिबात घेतले नाही.

उद्धव ठाकरे नागपूरच्या सभेला शहरात पोहोचून सभास्थळी जात असताना भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना सावरकरांची पोस्टर्स दाखवून त्यांचा निषेध केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मालेगावच्या सभेनंतर सावरकरांचा मुद्दा पुन्हा नागपूरच्या सभेत उपस्थित करतील, असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. पण उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांवर टीका करूनही अखेरपर्यंत आपल्या भाषणात सावरकरांचे नाव घेतले नाही. त्यामुळेच राहुल गांधींना दम भरणारे दम भरणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वडेट्टीवार कन्येपुढे मात्र नांगी टाकल्याचे स्पष्ट झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचे समर्थन केल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका भाषणात केला होता. त्यानंतर आपल्या भाषणाचे समर्थन करताना त्यांनी सावरकरांच्या सहा सोनेरी पान या पुस्तकाचा उल्लेख केला होता. या मुद्द्यावर महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ तयार झाले होते. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी शिवानी वडेट्टीवार यांना माफी मागायला सांगू असे म्हटले होते.



त्यामुळे उद्धव ठाकरे नागपूरच्या आजच्या वज्रमूठ सभेत सावरकर विषय काढून शिवानी वडेट्टीवार यांना खडे बोल सुनावतील, असे अनेक निरीक्षकांचे मत होते. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राम मंदिर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या या सर्वांची नावे घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जबरदस्त फटकेबाजी केली. संघ आणि भाजपचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली. शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानवेधारी नाही असे त्यांनी पुन्हा सांगितले, पण हिंदुत्वावर एवढी फटकेबाजी करताना उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचे नाव एकदाही घेतले नाही. उलट मोहन भागवत हे मशिदीत जातात. भाजपचे नेते मदरशांमध्ये जाऊन कवाली ऐकतात, हे त्यांचे हिंदुत्व आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

भाजप नेत्यांच्या हाती कोलीत

उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणामुळे सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांना आता जोर चढणार आहे. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर दम जरूर भरला. त्यानंतर शरद पवारांनी राहुल गांधींना 18 पक्षांच्या बैठकीमध्ये त्याच मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलले, पण तरीही काँग्रेस नेते बधले नव्हते. शिवानी वडेट्टीवार यांच्यासारख्या ओबीसी तरुण नेत्याच्या मुखातून काँग्रेसने पुन्हा सावरकरांची बदनामी केली. त्या मुद्द्यावर शिवानी वडेट्टीवार आणि अन्य काँग्रेस नेत्यांना सुनावण्याऐवजी उद्धव ठाकरे नागपूरच्या वज्रमूठ सभेत गप्प बसले. हा मुद्दा आता महाराष्ट्रात भाजपचे नेते पेटवण्याची दाट शक्यता आहे.

 Mahavikas aghadi vajra muth sabha in nagpur

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात