RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, एमएसएफ दरात कोणताही बदल केलेला नाही. कोणताही बदल न करता रेपो दर 4 टक्के राहील. MSF दर आणि बँक दर कोणतेही बदल न करता 4.25 टक्के राहतील. त्याच वेळी रिव्हर्स रेपो दरदेखील कोणत्याही बदलाशिवाय 3.35 टक्के राहील. यामुळे ईएमआयमध्येही बदल होणार नाही. RBI Monetary Policy No change in RBI Repo rates, GDP growth rate estimated at 9 point 5 percent
वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, एमएसएफ दरात कोणताही बदल केलेला नाही. कोणताही बदल न करता रेपो दर 4 टक्के राहील. MSF दर आणि बँक दर कोणतेही बदल न करता 4.25 टक्के राहतील. त्याच वेळी रिव्हर्स रेपो दरदेखील कोणत्याही बदलाशिवाय 3.35 टक्के राहील. यामुळे ईएमआयमध्येही बदल होणार नाही.
आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास म्हणाले, “चलनविषयक धोरण समितीने मौद्रिक धोरणाबाबत उदारमत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या या पावलाचा हेतू वाढीला गती देणे आणि अर्थव्यवस्थेतील संकटावर मात करणे आहे.
दास म्हणाले, “कोविड-19 साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे बसलेल्या धक्क्यातून अर्थव्यवस्था बाहेर येत असल्याने लसीकरणाच्या गतीसह आर्थिक व्यवहार वाढतील. अर्थव्यवस्थेत पुरवठा-मागणीचा समतोल पुनर्संचयित करण्यासाठी बरेच काही करणे आवश्यक आहे.”
रेपो दर हा असा दर आहे ज्यावर आरबीआय आवश्यकता भासल्यावर बँकांना कर्ज देते आणि आरबीआय त्याचा वापर महागाई नियंत्रित करण्यासाठी करते. दुसरीकडे, रिव्हर्स रेपो दर हा असा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांकडून कर्ज घेतो. त्याचवेळी, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोना महामारीमुळे बिघडलेल्या अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा चांगली गती दिसून येत आहे.
RBI Monetary Policy No change in RBI Repo rates, GDP growth rate estimated at 9 point 5 percent
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App