
प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षात भाजपकडून जोरदार तडाखा खाल्ल्यानंतर महाविकासआघाडी ने विधान परिषद निवडणुकीत जोरदार जोर-बैठका काढल्या भरपूर व्यायाम केला पण भाजपने त्यांचा घाम काढायचा तो काढलाच.
Rarely in the history of Maharashtra has there been such a tumultuous election to the Legislative Council
आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी मतमोजणी दरम्यानच एकमेकांच्या मतांवर आक्षेप घेणे, ती मते बाजूला काढणे हे प्रकार महाविकास आघाडी आणि भाजपा यांनी सुरू केलेत. रामराजे निंबाळकर यांना पडलेल्या एका मताला बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यानंतर उमा खापरे यांना पडलेले एक मत देखील बाजूला काढले आहे. त्यामुळे राज्यसभे सारखीच मतमोजणी मध्यरात्री नंतरही चालणार असे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात क्वचितच विधान परिषदेची एवढी चुरशीची निवडणूक झाली असेल. विधान परिषदेची निवडणूक पार पडली आहे. मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांवर आक्षेप घेतला. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची मतमोजणीही लांबणीवर पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. भाजपने या आक्षेपावर केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी उत्तर पाठवले आहे. त्यानंतर 2 तास विलंबाने मतमोजणी सुरू झाली.
निवडणुकीच्या आचार संहितेचे उल्लंघन
विधान परिषदेसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेट्या बंद करण्याआधी काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यावर आक्षेप घेतला. गुप्त पद्धतीने मतदान असताना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे मत हे दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीमध्ये टाकले आहे. त्यानंतर मुक्ता टिळक आणि लक्ष्ण जगताप यांनी सही सुद्धा केली.
जर दोन्ही आमदारांनी सही केली असेल तर मतपत्रिका ही दुसऱ्या व्यक्तीने का टाकली?, असा आक्षेप काँग्रेसने घेतला. मतपत्रिकेवर प्राधान्य क्रम लिहिणे आणि मतपत्रिका मतपेटीत टाकणे या दोन्ही बाबी दोन्ही मतदात्यांच्या प्रतिनिधी यांनी केल्याने मतदान हे अवैध ठरते, असा आक्षेप काँग्रेसने घेतला होता. निवडणुकीच्या आचार संहिता १९६१ चे हे उल्लंघन असल्याचे या आक्षेपात नोंदवला होता. निवडणूक आयोगाने काँग्रेसचे अक्षय फेटाळून लावले.
त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी थांबवण्यात आली. त्यानंतर 2 तास विलंबाने मतमोजणी सुरू झाली. त्यानंतरच रामराजे निंबाळकर यांना पडलेल्या मतावर आणि त्यानंतर उमा खापरे यांना पडलेल्या मतावर अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रवादी यांनी आक्षेप घेतले त्यामुळे मतमोजणी दीर्घकाळ लांब असल्याचे दिसत आहे.
Rarely in the history of Maharashtra has there been such a tumultuous election to the Legislative Council
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद : शिवसेनेच्या सुहास कांदेंचे मत भाजपने घालवून दाखवले; जगताप, टिळकांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप!!
- विधान परिषद : सगळ्या जोर – बैठका, स्ट्रॅटेजी मतपेटीत बंद; निकालापर्यंत अंदाजाचे हवेत उडलेत पतंग!!
- Operation All Out : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 24 तासांत 7 दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरूच