विधान परिषद: महाविकास आघाडीला फडणवीसांचा पुन्हा धोबीपछाड; काँग्रेसचे भाई जगताप पराभूत भाजपचे प्रसाद लाड विजयी!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभा निवडणूक पाठोपाठ विधान परिषद निवडणूक देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारला धोबीपछाड दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत धडा घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आपापले उमेदवार “सेफ” करून घेतल्याने विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला आहे. Mahavikas Aghadi opposites Fadnavis again winner

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकींचा निकाल अखेर लागला आहे. एकूण 10 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण 11 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. भाजपचे पाच, तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे मिळून 6 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढाईत अखेर भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपला करिश्मा दाखवत विधान परिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडवून आणला आहे.

10 उमेदवारांसाठी 285 आमदारांनी मतदान केले होते. काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर घेतलेल्या आक्षेपामुळे या निवडणुकीच्या मतमोजणीला तब्बल दोन तास उशीर झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यामुळे 283 वैध मतांमधून हा निकाल लागला आहे.‘भाई’गिरी हरली, भाजपचे ‘लाड’

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, तर भाजपच्या पाचपैकी सर्व उमेदवार राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा मात्र दारुण पराभव झाला आहे. प्रसाद लाड यांना 26 मते मिळाली असून, भाई जगताप यांना 20 मते मिळाली आहेत. त्यामुळे प्रसाद लाड यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

कोणाला किती मते?

महाविकास आघाडी

शिवसेना

सचिन अहिर-26
आमशा पाडवी-26

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे- 27
रामराजे निंबाळकर- 26

काँग्रेस

चंद्रकांत हंडोरे- 26
भाई जगताप- 20

भाजप

श्रीकांत भारतीय- 26
प्रवीण दरेकर-26
राम शिंदे- 26
उमा खापरे- 26
प्रसाद लाड- 26

असे होणार पक्षीय बलाबल

या निकालामुळे आता विधान परिषदेतील पक्षीय बलाबलात बदल झाला आहे.

भाजप – २४
शिवसेना – १४
राष्ट्रवादी काँग्रेस – १०
काँग्रेस – १०
शेकाप – २
राष्ट्रीय समाज पक्ष – १
अपक्ष – ५
राज्यपाल नियुक्त (रिक्त) – १२

Mahavikas Aghadi opposites Fadnavis again winner

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात