लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही, अशावेळी लहान मुलांबबात अधिक काळजी घ्यावी लागेल, असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.Rapid increase in Omaicron patients, decision to start schools in the state should be reconsidered – Dr. Bharti Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.दरम्यान सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातच आढळले आहेत.त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा असं केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात १५ डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.यावर बोलताना डॉ. भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही, अशावेळी लहान मुलांबबात अधिक काळजी घ्यावी लागेल, असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे डॉ. भारती पवार म्हणाल्या की , एकीकडे आपण आदेश देतोय की सतर्क राहा, काळजी घ्या, नियमांचं पालन करा, पण त्याचबरोबर काही राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत.तसेच महाराष्ट्रातच ओमायक्रॉन रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने पुनर्विचार करावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App