पुण्यात वासनांधांचा हैदोस, वडिलांकडून स्वतःच्याच 12 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक बलात्कार, आईच्या मानलेल्या भावाकडून मुलीवर अत्याचार


पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वासनांधांचा हैदोस सुरू आहे. नातेवाइकांकडून तसेच कुटुंबातील व्यक्तींकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत हिंजवडी पोलिसांनी स्वतःच्याच मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक केली आहे. दुसऱ्या प्रकारात आईच्या मानलेल्या भावाने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. Rape of 12 year old daughter by father, mother’s brother raped girl


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वासनांधांचा हैदोस सुरू आहे. नातेवाइकांकडून तसेच कुटुंबातील व्यक्तींकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत हिंजवडी पोलिसांनी स्वतःच्याच मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक केली आहे. दुसऱ्या प्रकारात आईच्या मानलेल्या भावाने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

मुळशी तालुक्यात घडलेल्या घटनेत आई जवळ राहत नसल्याचा गैरफायदा घेत बापाने स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील हा 35 वर्षांचा असून तो मुळशी तालुक्यात राहण्याचा आहे. तो वेल्डिंगची कामे करतो. याप्रकरणी आरोपीच्या आईनेच म्हणजे पीडित मुलीच्या आजीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आयपीसी 376, 377, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार 13 मार्च ते 14 मार्च या कालावधीत घडला.

आरोपी आणि त्याच्या पत्नीचे कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे त्याची पत्नी बीड येथे माहेरी राहते. आरोपी, त्याची आई आणि बारा वर्षांची पीडित मुलगी एकत्र राहतात. आरोपीने धमकी देऊन स्वतःच्याच मुलीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी देखील आरोपीने तिला दिली होती.हा सर्व प्रकार तिने आजीला सांगितला. आजीने या मुलीला घेऊन हिंजवडी पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकुल न्यामने करीत आहेत.
कोथरूड परिसरात घटनेत आईने भाऊ मानलेल्या मामाने घरी येऊन तेरा वर्षांच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि कोणाला काही सांगितल्यास या मुलीला तसेच तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील गवळे (रा. अप्पर इंदिरानगर, व्ही आय टी कॉलेज जवळ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळे हा याला पीडित मुलीच्या आईने भाऊ मानलेले आहे. आरोपी अधूनमधून या महिलेच्या घरी राहण्यास येत होता. मे 2021 मध्ये देखील तो त्यांच्या घरी राहण्यास गेलेला होता. पीडित मुलीची आई आणि वडील घरामध्ये किराणामाल आणण्याकरता बाहेर गेले असताना आरोपीने घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेतला. या मुलीला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर तिला अश्लील व्हिडिओ दाखवून त्या व्हिडिओप्रमाणे आवाज काढण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्याने मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. याबाबत जर कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या मुलीने बरेच दिवस यासंदर्भात घरामध्ये कोणाला काहीही सांगितले नाही. मात्र मुलीने याबाबत आईला घडलेली हकीकत सांगताच आईदेखील हादरली. कुटुंबियांनी पीडित मुलीच्या कोथरूड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Rape of 12 year old daughter by father, mother’s brother raped girl

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर