विशेष प्रतिनिधी
पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय काढताच त्याला देशभर जो प्रतिसाद मिळाला त्यातूनच त्यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत देशावर भोंग्यांवरून हनुमान चालीसा लावण्याची तयारी करा, असे आवाहन केले आहे.Raj Thackeray: Prepare to make Hanuman Chalisa on trumpets all over the country; Raj Thackeray’s appeal !!
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर केवळ ठाकरे – पवार सरकारच नाही तर देशातील अन्य राज्यांमधील राज्य सरकारांना देखील टार्गेटवर घेतले आहे. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही. तो सामाजिक विषय आहे. मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेला विरोध नाही पण त्यांना जर मशिदींवरचे भोंगे उतरवायचे नसतील तर आम्हीही हनुमान चालीसा भोंग्यांवर लावणारच. किंबहुना तो लावण्याची तयारी संपूर्ण देशभर करावी, असे आवाहन राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधवांना पत्रकार परिषदेत केले.
दिल्लीसह देशात काही ठिकाणी रामनवमी आणि हनुमान जयंती मिरवणुकांवर समाजकंटक गुंड माफियांनी दगडफेक केली आहे. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, की आमचे हात देखील बांधलेले नाहीत. आम्हीही हातात दगड घेऊ शकतो. दगडच काय पण मिळेल ते हत्यार घेऊन आम्ही प्रतिकार करू शकतो. पण आम्हाला तसे करायला लावू नका, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.
त्याचवेळी राज ठाकरे यांनी 3 मे ईद सणापर्यंत मला काही बोलायचे नाही, पण नंतर मुसलमानांनी मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात भोग्यांवर हनुमान चालीसा लावला जाईल, असा इशारा दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा आणि देशाच्या संविधानात पेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, असे ते म्हणाले आहेत. मूळात अनधिकृत भोंगे उतरवलेच पाहिजेत. त्यांना परवानगी देऊ नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App