प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी शिवतीर्थला भेट दिली. या शिवतीर्थमध्ये या दोन्ही नेत्यांच्या भेटीत नेमके काय शिजले आहे?, याचे तर्कवितर्क महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाले आहेत. raj thackeray and devendra fadnavis meet
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी अमृता या देखील होत्या_ असे सांगण्यात येते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी गॅलरीत येऊन आपल्या भेटीची साक्ष पत्रकारांना दिली. पण नंतर आतमध्ये जाऊन नेमकी काय चर्चा केली याची भनक माध्यमांना अद्याप तरी लागू दिलेली नाही. राज ठाकरे यांनी आपले नवे घर देवेंद्र फडणवीस दांपत्याला दाखवले का? फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या कलात्मकतेची कशी प्रशंसा केली? वगैरे बातम्या देखील अजून बाहेर आलेल्या नाहीत.
राज ठाकरे – शरद पवार भेट; एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी; दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार
परंतु आगामी मुंबई महापालिक आणि अन्य 17 महापालिकांच्या निवडणुकांचा पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे तर्क माध्यमांनी लावले आहेत. दोन्ही नेत्यांनी अथवा त्यांच्या प्रवक्त्यांनी या भेटीबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे माध्यमांच्या तर्कवितर्क यांवरच सर्व बातम्या अवलंबून आहेत. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमके काय शिजले त्याच्या “राजकीय वाफा” बाहेर यायला अजून काही काळ लोटावा लागेल.
याआधी दिवाळी पाडव्याच्या दिवशी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आपले मित्र राज ठाकरे यांची शिवतीर्थावरच येऊन भेट घेतली होती. आज देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची चर्चा भेट घेण्यापूर्वी भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे फडणवीस राज ठाकरे यांच्या चर्चेत एसटी संपाचा मुद्दा आला असावा असा तर्क माध्यमांनी लावला आहे. पण एकूण फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरच या चर्चेत नेमके काय शिजले?, याचे तर्कवितर्कांना पलिकडचे खरे उत्तर अद्याप कोणाला सापडलेले नाही…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App