‘’राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी…’’; चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान!

Chandrashekhar Bawankule

राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याच्या बातम्या समोर आल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

विशेष प्रतिनिधी

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असून, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हे वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत राहुल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा झालेला अवमान पाहता, भाजपाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींना उद्देशून सूचक इशारा दिला. Rahul Gandhi should apologize for his remarks about Savarkar before coming to Maharashtra  Chandrasekhar Bawankule

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘’उद्धव ठाकरेंना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांबद्दल माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ज्या पद्धतीने अहवेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा नाही तर जाणीवपूर्वक पाच-पाचवेळा सावरकरांचं नाव घेऊन आणि त्यांना वारंवार समजावल्यावरही, अनेकांनी त्यांना समजावलं की तुम्ही सावरकरांवर बोलून नका, तुमची ती उंची नाही. तरीही त्यांनी अपमान केला, महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागा, मगच महाराष्ट्रात पाय ठेवा.’’

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे बॅकफूटवर जावे लागलेल्या राहुल गांधींना आता पुढचा धक्का देत मराठी माध्यमांनी त्यांच्या “सूत्रां”च्या हवाल्याने राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याच्या बातम्या दिल्या. पण या बातम्या पाहिल्याबरोबर तातडीने पुढे येऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खुलासा करून टाकला, राहुल गांधी मातोश्रीवर येणार नाहीत. तसा कोणताही प्रोग्रॅम नाही!!

Rahul Gandhi should apologize for his remarks about Savarkar before coming to Maharashtra  Chandrasekhar Bawankule

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात