राज्यावर कोणतेही संकट आले की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलणं हीच आता महाराष्ट्राची ओळख झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकारला फटकारले आहे.Pushing responsibility at the Center is the identity of Maharashtra, Raosaheb Danve’s target on the Thackeray government
विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यावर कोणतेही संकट आले की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलणं हीच आता महाराष्ट्राची ओळख झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकारला फटकारले आहे.
दानवे म्हणाले, कोविड संक्रमणाचा प्रादूर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही,
तेव्हा आघाडी सरकारने त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकार वर दोषारोप सुरू केले आहेत. केंद्राने सर्व राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी 162 प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑ क्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी 2021 ला दिली होती.
मंजूर केलेल्या 162 प्लांट्समधून अशा 10 प्लांट्सच्या इंस्टॉलेशनची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने या दिशेने कोणतेही कठोर पाऊले उचलले नाहीत.
दानवे म्हणाले, जानेवारी 2021ला प्लांट उभारण्यासाठी मंजुरी दिली असून या विषयावर युद्धपातळीवर जर काम केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. इतकंच हा नाही तर, या संपूर्ण योजनेचा खर्च केंद्र सरकारच करणार आहे.
त्यासोबत यामध्ये सात वषार्साठी लागणारा देखभाल खर्च देखील केंद्र सरकार देणार आहे. पण महाराष्ट्र सरकारकडून असे काहीही झाले नाही व यातूनच महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा व बेजवाबदारपणा यातून स्पष्टपणे दिसून येतो,.
केंद्र सरकारकडून मिळणाºया सर्व मदतींमध्ये, महाराष्ट्र राज्याला मिळणारा वाटा सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे, असे सांगून दानवे म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मॅट्रीक टन ऑ क्सिजन दिले आहे.
तसेच महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑ क्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे.
त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड्स येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा देखील सर्वाधिक वाटा मिळतो आहे.
तसेच 25 एप्रिल रोजी रुग्णालयांना ऑ क्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या मोदींच्या निदेर्शानुसार पीएम केअर्स फंडाने देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील 551 समर्पित प्रेशर स्विंग अडसोर्पशन (पीएसए) मेडिकल आॅक्सिजन जनरेशन प्लांट्सच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला तत्वत: मान्यता दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App