लोकांत जाण्याची सवय नसल्यानेच राहुल गांधी धडपडून पडले, रावसाहेब दानवे यांची टीका

मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केले आहे. लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्या कारणाने राहुल गांधी हे धडपडून पडलेत, अशी टीका केंद्रीय कृषी राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

लातूर : मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केलं आहे. लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्या कारणानं राहुल गांधी हे धडपडून पडलेत, अशी टीका केंद्रीय कृषी राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

लातूर येथे शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचे महत्व समजावून देताना दानवे बोलत होते. राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते पडले, असे म्हटले जात आहे. याबाबत दानवे म्हणाले, गर्दीत जाण्याची सवय नसल्या कारणाने गर्दीत कसं चालावं हे त्यांना कळलं नाही. यामुळे राहुल गांधी पडले.

मागील सहा वर्षांपासून देशात भाजपचे सरकार आहे. सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सर्व निर्णयांना फक्त विरोध करणे एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. जनमताअभावी काळ झालेलं तोंड विरोध करून गोरे होतं का? हे पाहण्यासाठी काँग्रेस विरोध करत आहे.

दानवे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे खूप महत्वपूर्ण आहेत. मात्र, विरोधी पक्ष त्याला कायम विरोध करत आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत विधेयक पास केलं आहे. मात्र, राज्य सरकारने हे विधेयक आम्ही आमच्या राज्यात लागू करून घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. मात्र, कायदा जर पाळला नाही तर त्याचे परिणाम होतील ते पुरवायला सरकारने तयार असावे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*