भटक्‍या विमुक्‍त समाजासाठी बांधलेल्‍या सदनिकांमध्ये 200 कोटीची फसवणुक – 218 सदनिकांची केली परस्पर विक्री


वारजे माळवाडी येथे शासनाने भटक्‍या आणि विमुक्‍त समाजासाठी शासनाने साडेचार एकर जागा राखीव दिली होती. त्‍या ठिकाणी बिल्‍डरच्‍या मदतीने 396 सदनिका बांधून त्‍यापैकी 218 जणांकडुन रकमा घेऊनही त्‍यांना सदनिका न देता त्‍यांची परस्पर विक्री करत गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


प्रतिनिधी

पुणे –वारजे माळवाडी येथे शासनाने भटक्‍या आणि विमुक्‍त समाजासाठी शासनाने साडेचार एकर जागा राखीव दिली होती. त्‍या ठिकाणी बिल्‍डरच्‍या मदतीने 396 सदनिका बांधून त्‍यापैकी 218 जणांकडुन रकमा घेऊनही त्‍यांना सदनिका न देता त्‍यांची परस्पर विक्री करत गैरव्यवहार करणाऱ्या चेअरमनसह दोघांवर वारजे माळवाडीह पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.Pune police EoW wing registered २०० cr cheating case

दिपक अशोक वेताळ (40, रा. गंधर्वनगरी ,बिल्डीग मोशी,पुणे) यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरून रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचे चेअरमन अंबादस दत्तात्रय गोटे (वय 70, आशिर्वाद गार्डन सोसायटी, शिवणे,पुणे. मुळपत्ता रा. जोशीवाडी, तहसिलदार कचेरी शेजारी, पो. घोडनदी, ता. शिरुर, जि.पुणे) आणि गणेश बंजरंग माने (वय 42 वर्षे, रा.जोशी वाडी,शिरुर,जिल्हा पुणे ) व इतरांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 1990 ते मार्च 2022 दरम्‍यान वारजे माळवाडी येथील स.न 35/2 रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीत हा प्रकार घडला.



पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रामनगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेचे चेअरमन अंबादस दत्तात्रय गोटे तसेच सेक्रेटरी गणेश बंजरंग माने व इतरांनी रामनगर सोसायटीचे मुळ 218 सभासदांना शासनाकडुन मिळणा-या जागेवर घरे बांधुन देतो असे म्हणुन फिर्यादी व इतर सभासदाकडुन सन 1990 पासुन अदयाप पर्यत वेगवेगळया प्रकारे रोख रक्कमा स्वीकारल्‍या.

त्याचे करिता शासनाकडुन 1 हेक्टर 76 आर जमीन प्राप्त करुन त्यावर 396 प्लॅटस बांधुन ते रामनगर सोसायटी चे मुळ 218 सभासदांना न देता. आर्थिक लाभाकरिता इतर लोकांना शासनाच्या परवानगी शिवाय विक्री केली. मात्र मुळ सोसायटी सभासद व शासनाची अंदाजे 200 कोटी रुपयाची आर्थिक फसवणुक केल्‍याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच आंबदास गोटे व त्यांच्या सहका-यांनी शासनास व न्यायालयास वेळोवेळी खोटी महिती सादर करुन त्यांची दिशाभुल केली. या कामामध्ये सोसायटीचे चेअरमन अंबादास गोटे याला त्याचे नातेवाईक व इतर सहका-यांनी सहकार्य केले आहे. गुन्‍ह्याचा तपास आर्थिक गुन्‍हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल काळे करत आहे.

परस्पर सदनिका विकण्याची नव्‍हती परवानगी

या प्रकरणात एका बिल्‍डरला या सदनिका बांधण्याचे कामकाज दिले होते. त्‍यांने शासनाने सांगितलेल्‍यसा नागरिकांना सदनिका देणे अपेक्षीत होते. परंतु तसे न करता शासनाची कोणतीही परवानगी न घेता 396 सदनिका बांधल्‍या. त्‍यातील केवळ दहाच सदनिका भटक्‍या विमुक्‍त समाजाती नागरिकांना दिल्‍या. उरलेल्‍या सदस्यांना सदनिका न देता त्‍याची परस्पर विक्री केली. नागरिकांच्‍या लक्षात हा प्रकार आल्‍यानंतर आर्थिक गुन्‍हे शाखेने याची दखल घेत याबाबत गुन्‍हा दाखल केला आहे.

Pune police EoW wing registered २०० cr cheating case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात