Padma Awards 2021: पुणे :भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणारे पुनरूत्थानचे गिरीश प्रभुणे ‘पद्मश्री’ने सन्मानित…


भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताबाने गौरवून केंद्र सरकारने एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा उचित सन्मान केला आहे. पारधी जमातीसहित भटके विमुक्त समाजाला आत्मभान मिळवून देण्यात प्रभुणे यांचा मोठा वाटा आहे.  Padma Awards 2021: Pune: Girish Prabhune, who gave his life for the nomadic society, was honored with ‘Padma Shri’


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन यथे महाराष्ट्रातील 10 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शाळेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला.

गिरीश प्रभुणे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील. सत्तरच्या दशकात प्रचारक म्हणून काम करतानाच सामाजिक कार्याला वाहून घेण्याचे त्यांनी ठरविले. ऐंशीच्या दशकात त्यांनी श्री. ग. माजगावकर यांच्यासोबत ‘ग्रामायन’ प्रकल्पात त्यांनी भाग घेतला आणि निमगाव म्हाळुंगी (जि. पुणे) येथे मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. दलित आणि भटके विमुक्त समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला.

त्याला त्यांच्यातील धडाडीची वृत्ती आणि संघटन कौशल्य यांची जोड मिळाली आणि एक मोठे सामाजिक कार्य साकारत गेले. क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकासाठी घेतलेल्या पुढाकारातून त्यांच्यातील धडाडीच्या वृत्तीचे दर्शन घडले होते. पिंपरी चिंचवड येथे १९८०मध्ये ‘महाराष्ट्रव्यापी दलित साहित्य संमेलन’ भरवून त्यांनी संघटनशक्तीचे दर्शनही घडविले होते. अत्यंत मागास व गुन्हेगार समजल्या गेलेल्या फासेपारधी समाजाच्या विकासकामाला त्यांनी १९९१पासून सुरुवात केली.

भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताबाने गौरवून केंद्र सरकारने एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा उचित सन्मान केला आहे.

पारधी जमातीसहित भटके विमुक्त समाजाला आत्मभान मिळवून देण्यात प्रभुणे यांचा मोठा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड येथे ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ची स्थापना केली आणि पारधीसह अन्य भटके समाजाच्या चारशेहून अधिक मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. यामध्ये चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शाळेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 10 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Padma Awards 2021 : Pune: Girish Prabhune, who gave his life for the nomadic society, was honored with ‘Padma Shri’

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात