विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मोक्कामॅन ठरले आहेत. सोमवारी कुख्यात गुंड बल्लूसिंग टाकच्या गुन्हेगारी टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का लावला आहे. ११ महिन्यात आतापर्यंत ५० टोळ्या कारागृहात पाठविण्यात आल्या आहेत.Pune Police Commissioner become Mokkaman, Mokka to the fiftieth gang in the city
बल्लूसिंग प्रभूसिंग टाक (रा. वानवडी), उजालासिंग प्रभूसिंग टाक (रा. वानवडी), सोमनाथ नामदेव घारोळे (रा. हडपसर), पिल्लूसिंग कालूसिंग जुन्नी (रा. गोसावीवस्ती, हडपसर), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (रा. रामटेकडी), गोरखसिंग गागसिंग टाक (रा. हडपसर) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. यातील टाक बंधूना पोलिसांनी अटक केलेली आहे. बल्लूसिंग टाक हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०१८ पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, घातक शस्त्र यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी देखील कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु, त्याचे गुन्हे सुरूच होते. दरम्यान, कोथरूड परिसरात घातक शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याचा त्याने प्रयत्न केला.
एका सोसाटीतील बंद फ्लॅट फोडून दरोडा टाकून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पाहिले होते. त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी शासकीय कर्तव्य करताना अडथळा निर्माण करून खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना कोथरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी या टोळीवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची छाननीकरून तो अप्पर पोलीस आयुक्तांकडे पाठविला.
त्यानुसार, हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मान्यतेसाठी आला. आयुक्तांनी तात्काळ या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ११ महिन्यात तब्बल ५० टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. आजची त्यांची अर्धशतकी ५० वी मोक्का कारवाई ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App