PUNE : आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी , जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आदेश


नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाच्या प्रमुखावर सोपविण्यात आली आहे. PUNE: Now citizens are banned from entering government offices without prior permission, District Collector Dr. Rajesh Deshmukh has ordered


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.यावेळी सरकारी आणि खाजगी कार्यालयासाठी सुद्धा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. असं असलं तरी आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.नागरिकांना पूर्वपरवानगीशिवाय सरकारी कार्यालयात जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे या आदेशात म्हटले आहे.तसेच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाच्या प्रमुखावर सोपविण्यात आली आहे.



त्यामुळे इथून पुढे महत्त्वाच्या कामांसाठी सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वी किंवा संबंधित कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी किंवा पूर्व परवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.शहरातील हॉटेल, दुकाने, मॉल तसेच ई-कॉमर्स या ठिकाणी लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास संबंधित दुकाने हॉटेल किंवा कार्यालय सील केले जाणार आहे. अस देखील जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणले.

PUNE: Now citizens are banned from entering government offices without prior permission, District Collector Dr. Rajesh Deshmukh has ordered

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात