
विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले आहे. आज दुपारी 3.00 वाजल्यापासून पुणे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे हे दोन्ही मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरू होणार आहेत. या मेट्रोचे तिकीट दर कमी असल्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. सोमवार 7 मार्चपासून मेट्रो सेवा सकाळी 7.00 वाजता सुरू होऊन रात्री 9.00 पर्यंत सुरू असेल. Pune Metro Fare: Metro Punekar from 3.00 pm today !!; The ticket price is like this !!
मेट्रोचे तिकीट दर
या दोन्ही मार्गांचे कमीत-कमी तिकीट 10 रुपये आणि जास्तीत जास्त तिकीट 20 रुपये असेल. दोन्ही मार्गांवर समान तिकीट दर असणार आहेत. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या तुलनेत पुणे मेट्रोचे दर कमी असल्याचे म्हटले जात आहे.
पुणे मेट्रोविषयी अधिक माहिती
- सकाळी 7.00 वाजता मेट्रो सुरू होऊन, रात्री 9.00 वाजता बंद होईल.
- प्रत्येक मार्गावर एकूण 27 फेऱ्या होतील.
- ज्यांचे 100 तासांचे मेट्रो ड्रायव्हिंग पूर्ण झाले आहे, असे प्रशिक्षित चालक दोन्ही मेट्रोला कार्यरत असणार आहेत व त्यांना 8 तासांची ड्युटी असेल.
- ताशी 80 किलोमीटर या वेगाने प्रवाशांना सेवा प्रदान करणा-या महामेट्रोला रेल्वे सुरक्षा व दक्षता आयुक्तांची परवानगी मिळाली आहे.
- प्रत्येक स्थानकात मेट्रो 20, गर्दी असेल तर 30 सेकंद थांबेल.
- मेट्रोच्या सर्व डब्यांचे दरवाजे आपोआप बंद आणि उघडले जाणार आहेत. दरवाजा बंद झाल्याशिवाय मेट्रो सुरूच होणार नाही.
Pune Metro Fare : Metro Punekar from 3.00 pm today !!; The ticket price is like this !!
महत्त्वाच्या बातम्या
- PM Modi Pune Metro : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; मुख्यमंत्र्यांनी हजेरी टाळली!!
- Modi Pune Metro : पुणे मेट्रोचे उद्घाटन; प्रत्यक्ष मेट्रोत पंतप्रधान मोदींचा राजकीय पुढाऱ्यांशी नव्हे, तर विद्यार्थ्यांशी थेट संवाद!!
- दोन रेल्वे गाड्यांची टक्कर टळणार; स्वदेशी स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली ‘कवचची चाचणी
- पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण