विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी उत्तर कोरियाने एका आठवड्यात दुसऱ्यांदा गुप्तचर उपग्रह प्रणालीची चाचणी करून वातावरण तापवले आहे. याआधी शनिवारी किम जोंग यांनीही गुप्त क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. या सगळ्यात दक्षिण कोरियाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीपूर्वी हा एक प्रकारचा कट असल्याचा इशारा विश्लेषकांनी दिला आहे. Testing of North Korea’s spy satellite system
किम जोंग उन यांच्यावर जागतिक दबावाचा कोणताही प्रभाव नाही. शासक किम जोंग सतत आपली लष्करी शस्त्रे आणि संबंधित उपकरणांचे आधुनिकीकरण करण्यात गुंतलेले असतात.
शनिवारीही केली क्षेपणास्त्र चाचणी, याआधी उत्तर कोरियाने शनिवारी सकाळी अज्ञात क्षेपणास्त्राची चाचणी करून आसपासच्या देशांना चकित केले. हे क्षेपणास्त्र कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेकडील महासागराच्या दिशेने डागण्यात आले. उत्तर कोरियाने या वर्षात आतापर्यंत एकूण नऊ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत.
जानेवारीमध्ये सात शस्त्रांची चाचणी घेण्यात आली उत्तर कोरियानेही जानेवारी महिन्यात सात शस्त्रांची चाचणी केली, ज्यामध्ये २०१७ पासून तयार करण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचा समावेश आहे. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिथावणी देण्यासाठी येथील सर्वोच्च नेता किम जोंग उन यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही शस्त्रास्त्र कार्यक्रमाच्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त केली असून उत्तर कोरिया पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू करू शकतो, ज्यामुळे या भागात युद्धाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more