नाव न घेता अजितदादांची राज्यपाल भगतसिंह कोशियारींच्या विषयी पंतप्रधान मोदींकडे तक्रार!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या विरोधात तक्रार करून घेतली. अजित पवार म्हणाले, की अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ही वक्तव्य महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. छत्रपतींना स्वराज्य स्थापलं. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाय. कुणाही बद्दल माझ्या मनात आकस नाही. हेही नम्रपणे नमूक करतो. मोदीजी, आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी पहिल्यांचा रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची ही भूमी.. राजमाना राष्ट्रमाता जिजाऊंची ही भूमी आहे. Ajit Dad’s complaint to PM Modi about Governor Bhagat Singh Koshiyari without mentioning his name !!

मोदींना एक सांगायचंय, अंधेरी घाटकोपर मार्गावर पहिली मेट्रो सुरुवात केली…२००६ ला २०१४ ला भूमिपूजन.. ऑगस्ट २०१४ ला सुरु झाली… आणि ती मेट्रोल २०१९ ला सुरु झाली.. अजूनही पिंपरी-स्वारगेट जसं सुरु आहे तस स्वारगेट ते कात्रज… हडपसर ते खराडी…. या दोन मार्गिकेचा अहवाल प्रकल्पाचं काम सुरु आहे.. ते काम पूर्ण करुन जसं आताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के राज्य आणि ५० टक्के केंद्राची आहे… आणि १० टक्के मनपाची आहे.. त्याच धर्तीवर मेट्रो सुरु करण्यासाठी मदत आपण केली.. तशीच ही मदतही आम्हाला करावी… आपल्यामुळे गडकरीसाहेबांमुळे नागपूर मुंबई पुणे नाशिक मेट्रो दोनसाठी मदत झाली पाहिजे. मुळा मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्प, जायका प्रकल्प.. येणाऱ्या काळात सुशोभीकरणाचं काम होईल… मोदींना विश्वास देतो की मुळामुठा नदी शुद्धीकरण जायका प्रकल्प – नदी पात्रातले पाण्याचे स्त्रोत, या सगळ्याचं भान ठेवावं लागणार आहे. यावरही काम सुरू आहे.

आज दिवस पुण्याचा स्वप्नपूर्तीचा दिवस : फडणवीस

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतींना मानाचा मुजरा बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो.. अखिल भारताचे लाडके आणि खऱ्या अर्थानं वैश्विक नेतृत्त्व असलेले मोदीजी राज्यपाल, उपमुख्यमंत्री, खासदार, मंत्री सर्व आमदार, सन्मानिय एम्बेसेडर पुण्याचे पिंपरी महापौर.. उपस्थित बंधूनो आणि भगिनींनी..



आज दिवस पुण्याचा स्वप्नपूर्तीचा दिवस.. आज पुण्याची मेट्रो धावली, याचं पहिलं तिकीट मोदींनी मोबाईलवर पेमेंट करुन काढलं.. आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केलीये तर मेट्रोवाल्यांना सांगणार की नंतर आमच्याकडून वसून करुन घ्या.. अनेक अडचणी होत्या.. पण महामेट्रोचं अभिनंदन..महामेट्रोनं विक्रमी वेळात पुणे मेट्रोचं काम केलंय.

महापौर मुरलीधर मोहोळ यांचे भाषण

बऱ्याच वर्षापासून आपण जे स्वप्न पाहत होतो त्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. ज्यांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. ही महत्त्वाची घटना आहे. ६० वर्षानंतर पंतप्रधान पुण्यात आले. छत्रपती महाराजांनी जे आदर्श विचार मांडले जे तत्व मांडले त्याची प्रेरणा राजकीय मंडळी घेतील. मुळा आणि मुठा नदीच्या योजनेचा शुभारंभ होत आहे. ८४१ कोटी रुपये केंद्राने दिले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत आहे. जावडेकर, बापट आणि गडकरींनी या प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान दिलं. फडणवीसांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात विशेष लक्ष घातलं. आता नद्यात गढूळ पाणी जाणार नाही आज पाच हजार कोटींचा एक प्रकल्प सुरू होत आहे. साबरमतीच्या धर्तीवर मुळा आणि मुठा नदी विकसीत होणार आहे. ४४ किलोमीटरच्या या नद्यांपैकी ९ किलोमीटरच्या नद्यांचं विकासाचं काम सुरू होणार आहे. नदीकाठ बनवला जाईल. जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकसह हरित पट्टे या नद्यांभोवती करणार आहोत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. १४३ ई बसेसचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. गेल्या तीन वर्षात १५०० ईबसेस आणि सीएनजी बसेस आणल्या. देशातील पहिला ई बस डेपो पुण्यता झाला. गडकरींच्या आग्रहास्तव हे करण्यात आलं. आर के लक्ष्मण यांच्या नावाने आर्ट गॅलरी करत आहोत. स्वच्छ सर्व्हेक्षणात तीन वर्षापूर्वी ३७ व्या स्थानावर असलेलं पुणे शहर पाचव्या स्थानावर आहे. पीएम आवाज योजने अंतर्गत सव्वालाख घरे बांधणार आहोत. दहा हजार घरे बांधलेही आहे. राहण्यासाठीचं योग्य शहर म्हणून पुणे पुढे आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.

Ajit Dad’s complaint to PM Modi about Governor Bhagat Singh Koshiyari without mentioning his name !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात