पबजी गेम खेळण्याकरिता ऑनलाईन व्यवहारासाठी मुंबई येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या बँक खात्यातून तब्बल 10 लाख रुपये चोरी केले. चोरी उघडकीस आल्यावर घरातले रागावतील या भीतीने 16 वर्षीय मुलगा पळून गेला. या मुलाला मुंबई पोलिसांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली केव्हज परिसरातून ताब्यात घेतले आहे. PUBG Addict Minor boy steals Rs 10 lakh from mothers Bank account, incident From Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पबजी गेम खेळण्याकरिता ऑनलाईन व्यवहारासाठी मुंबई येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या बँक खात्यातून तब्बल 10 लाख रुपये चोरी केले. चोरी उघडकीस आल्यावर घरातले रागावतील या भीतीने 16 वर्षीय मुलगा पळून गेला. या मुलाला मुंबई पोलिसांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली केव्हज परिसरातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी या मुलाची माहिती मिळाली होती. या मुलाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासादरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, या मुलाला गत महिन्यापासून पबजीचा नाद लागला होता.
पोलिसांच्या मते, या अल्पवयीन मुलाने पबजी खेळण्यासाठी आपल्या आईच्या खात्यातून 10 लाख रुपये खर्च केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा या मुलाच्या पालकांना ऑनलाइन व्यवहाराची माहिती मिळाली, तेव्हा या मुलाला घरातले रागावले. यामुळे त्याने चिठ्ठी लिहून घरातून पळ काढला. सध्या मुलाला पोलिसांनी आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App