अनिल देशमुखांच्या अटकेविरोधत निषेध ; चक्काजाम आंदोलन , सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांना ईडीने २ नोव्हेंबरला अटक केली.Protest against the arrest of Anil Deshmukh; Chakkajam movement, accused of revenge arrest


विशेष प्रतिनिधी

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संचालनालयाने (ईडी) २ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.ही अटक सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काटोल तालुक्यात विविध ठिकाणी निषेध व चक्काजाम आंदोलन केले.

नेमक प्रकरण काय आहे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांना ईडीने २ नोव्हेंबरला अटक केली. ईडीच्या विशेष न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे.तसेच ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स बजावला आहे.ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही.

अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.देशमुखांवरील सर्व आरोप निराधार आहेत असा आरोप करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अटकेचा निषेध केला.

या ठिकाणी चक्काजाम आंदोलन

अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोल नरखेड तालुक्यातील विविध १५ ठिकाणी कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यामध्ये खांबही, गोंदीडीग्रस, सहजापूर, गोंडीमोहगाव, मसखापरा, भिष्णुर, पिंपळगाव, मसखापरा, येनवा, कोहळा, तिनखेडा, दिग्रस (बु) या गावात केंद्र सरकार आणि ईडीचा निषेध करण्यात आला.

Protest against the arrest of Anil Deshmukh; Chakkajam movement, accused of revenge arrest

महत्त्वाच्या बातम्या