अनिल देशमुखांच्या अटकेनंतर मुलगा, जावई आणि इतर नेत्यांचा येणार नंबर, किरीट सोमय्यांनी केले ट्विट

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. आता याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांची पाळी आहे. kirit somaiya says anil deshmukh arrested now turn of other ncp shivsena leaders


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. आता याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांची पाळी आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांची पाळी आहे. वसुलीचा पैसा मुलगा, जावई, साथीदार… आणि अनिल परब यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहोचायचा.

अनिल देशमुख यांच्या मुलाला ईडीने समन्स बजावले

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर आता ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्याला शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची वसुली करण्यास सांगितल्याचा दावा माजी आयुक्तांनी या पत्रात केला होता. याप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारी चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांच्या वतीने एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तरे देण्यात आली नसल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. देशमुख सध्या 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.

kirit somaiya says anil deshmukh arrested now turn of other ncp shivsena leaders

महत्त्वाच्या बातम्या