एकनाथ खडसेंना एक आठवडा अटके पासून संरक्षण


पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.Protection of Eknath Khadse from one week arrest


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यसरकारमधील अनेक नेत्यांच्या घरांवर आपण सीबीआय, एनसीबीच्या धाडी पडल्याच्या बातम्या पाहतोय, अशातच पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी


दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलासा मिळाला होता. त्यांच्याबाबत पुढील सुनावणी आज झाली. या सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.

खडसे यांना एक आठवडा अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला आहे. काही दिवसांपूर्वीच खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

Protection of Eknath Khadse from one week arrest

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात