WATCH : 6 चेंडूवर खणखणीत 6 चौकार, पृथ्वीचा जबरदस्त शो

Prithvi Shaw – आयपीएलच्या सामन्यांमध्ये आता रंग भरायला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामामध्ये बंगळुरू आणि दिल्लीच्या संघांनी आगेकूच केल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या संघानं तर ऋषभ पंतच्या नेतृत्वात सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. दिल्लीच्या या यशामध्ये फलंदाजांचा मोठा वाटा आहे. त्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या ओपनिंग जोडीनं महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. गुरुवारी तर पृथ्वीनं कोलोकाता नाईट रायडर्सच्या विरोधात विक्रमी कामगिरी केली. पहिल्याच ओव्हरच्या सहा चेंडूंवर त्यानं सहा चौकार खेचत हा विक्रम केलाय. Prithvi shaw hits record six fours in first over

हेही वाचा –