राष्ट्रपती निवडणूक : अपयशाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी फेटाळली उमेदवारी; राष्ट्रवादीच्या गोटातून गुलाम नबी आझादांचे नाव पुढे!!

प्रतिनिधी

मुंबई : देशभरातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचे नाव सुचवले असले तरी स्वतः त्यांनी मात्र आपल्या उमेदवारीची शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पवारांनी ही शक्यता फेटाळल्याची बातमी “द टाइम्स ऑफ इंडिया”ने दिली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पवारांनी आपण विरोधकांची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.Presidential Election: Against the Backdrop of Failure Pawar rejects candidature; The name of Ghulam Nabi Azad from the NCP faction is next

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचे नाव खुद्द सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुचवले होते. त्यानुसार मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा देखील केली होती. शरद पवार विरोधकांचे सर्वसंमत उमेदवार होणार अशा बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द पवार यांची भूमिका गुलदस्त्यात होती.परंतु “द टाइम्स ऑफ इंडिया”ने दिलेल्या बातमीनुसार पवारांनी स्वतःच्या उमेदवारीची शक्यता फेटाळली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत आहे. त्यातही एकट्या भाजपकडे लोकसभेत 300 पेक्षा अधिक खासदार आहेत. त्यामुळे विरोधकांचा राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडून येणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आपली उमेदवारी फेटाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदान च्या आकडेवारीनुसार विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जरी शरद पवारांसारख्या तगडा उमेदवार उभा केला तरी तो यशस्वी होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच पवारांनी आपल्या उमेदवारीची शक्यता फेटाळली असून राष्ट्रवादीच्या गोटातून गुलाम नबी आझाद यांचे नाव विरोधकांचा सर्व संमती उमेदवार म्हणून पुढे करण्यात आल्याची बातमी आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद विरोधकांचे सर्वसंमत उमेदवार होऊ शकतात, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.

दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी शरद पवारांचे नाव सुचवले आणि राष्ट्रवादीच्या गोटातून गांधी परिवाराचे विरोधक मानले गेलेले काँग्रेसचे जी 23 गटाचे वरिष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांचे नाव सुचवले गेले, यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या हायकमांडच्या संबंध एकमेकांची नेमके कसे आहेत?, हेच दिसून येत आहे.

Presidential Election: Against the Backdrop of Failure Pawar rejects candidature; The name of Ghulam Nabi Azad from the NCP faction is next

महत्वाच्या बातम्या