शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा ईडीच्या तपासात पाय खोलात चालला आहे. सरनाईक यांच्या निकवर्ती व्यावसायिकाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. योगेश देशमुख असे या व्यावसायिकाचे नाव आहे.Pratap Saranaika’s nearby businessman was arrested by ED
विशेष प्रतिनिधी
मुंबई :शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा ईडीच्या तपासात पाय खोलात चालला आहे. सरनाईक यांच्या निकवर्ती व्यावसायिकाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. योगेश देशमुख असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
17 मार्च रोजी ईडीने योगेश देशमुख यांच्या घरावर छापा घातला होता. यावेळी योगेश देशमुख यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाºयांसोबत हुज्जत घातली होती. घरावरील ईडीच्या छापेमारीनंतर देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते.
मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले. ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.मी रिक्षा चालवायचो. मेहनत करून इथे आलो. जे राजकारण सुरू आहे. ते सर्वांनाच माहीत आहे.
ईडी जेव्हा बोलावेल, तेव्हा मी चौकशीला जाईल. हे कॉपोर्रेट वॉर आहे. नेमका हा काय घोळ सुरू आहे, ते मला माहीत नाही. मी पूर्वी जसा होतो, तसाच आताही आहे. फक्त माझ्या पत्नी आणि मुलांना या सर्व प्रकरणात नाहक त्रास देण्यात आला याचं दु:ख आहे, असं सरनाईक म्हणाले होते.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App