उद्योगपती राज कुंद्राचा लॅपटॉप अश्लीलल व्हिडीओंनीच भरलेला, पोलिसांनी केली पोल खोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केलेल्या उद्योगपती राज कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये ५१ अश्ली ल व्हिडीओ सापडले आहेत, असा दावा मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांकडून करण्यात आला.porn films traced in Kundras laptop

कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये हॉटशॉट आणि बॉलीफेम ॲपसंबंधित अश्लीाल व्हिडीओ सापडले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. तसेच प्रदीप बक्षी या त्याच्या नातेवाईकाने पाठवलेल्या ई-मेलमध्ये हॉटशॉटबाबतचे महत्त्वाचे धागेदोरे असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.

या प्रकरणात आणखी एका आरोपीचा लॅपटॉप, सीडीआर, मोबाईल फोन, स्टोरेज एरिया नेटवर्क डिव्हाईस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बक्षीची लंडनमध्ये कॅनरेन नावाची कंपनी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत, तसेच त्यांच्या संभाषणात या व्यवसायातील आर्थिक तपशील असल्याचा दावा या वेळी करण्यात आला.

अश्लीाल चित्रपट निर्मिती आणि त्याचा कन्टेंट तयार केल्याच्या आरोपात पोलिसांनी कुंद्रावर गुन्हा दाखल केला आहे; मात्र पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असून कुंद्रा तपासात सहकार्य करत होता, असा दावा करणारी याचिका कुंद्राच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी केली आहे.

porn films traced in Kundras laptop

महत्त्वाच्या बातम्या